TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस'ने तन्वीला दिलं 'मोठं गिफ्ट', पाहून प्रेक्षकांची जळफळाट; विचारतायेत, 'हिलाच का?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte : कुटुंबाच्या भेटीनंतर बिग बॉसने तन्वी कोलतेला इतरांपेक्षा वेगळं गिफ्ट दिल्याने प्रेक्षकही पाहतच राहिले आहेत.
advertisement
1/7
BBM 6 :  'बिग बॉस'ने तन्वीला दिलं 'मोठं गिफ्ट', पाहून प्रेक्षकांची जळफळाट; विचारतायेत, 'हिलाच का?
बिग बॉस मराठी 6 च्या घरातील सदस्यांना या आठवड्यात सरप्राइझ मिळालं. ते म्हणजे त्यांचं खरं कुटुंब त्यांना भेटायला आलं. त्यामुळे एरवी बिग बॉसच्या घरात दिसणारी वाद, भांडणं तात्पुरती थांबली आणि घरात प्रेम बहरलं.
advertisement
2/7
बिग बॉसच्या घरात इतक्या दिवसांत घरातील सदस्य त्यांच्या कुटुंबातील गोष्टीही सांगताना दिसेल. अखेर त्यांच्या त्या कुटुंबाची, त्या सदस्यांची भेट झाली. विशालचे बाबा, अनुश्रीची आई, सागरची बायको आणि मुलगी  आणि आता तन्वीची आजी तिला भेटायला आली आहे.
advertisement
3/7
तन्वी कोलते सतत आपल्या आजीबाबत बोलताना दिसली आहे. पत्राच्या नॉमिनेशन टास्कमध्येही तिला आजीचं पत्र आलं होतं. पण प्रभूला आईचं पत्र वाचू देण्यासाठी तिने आपल्या आजीचं पत्र वाचलं नाही.
advertisement
4/7
अखेर तन्वीची ती लाडकी आजी तिला भेटायला बिग बॉस मराठीच्या घरात आली. बिग बॉस मराठीच्या नव्या एपिसोडच्या प्रोमोत तुम्ही पाहू शकता आजीला पाहून तन्वीला अश्रू अनावर झाले, आजीनेही नातीला पाहताच मिठी मारली. तन्वी आजीला नजर लागू नये म्हणून तिच्या कानामागे आपल्या डोळ्यातील काजळाचा टिकाही लावते.
advertisement
5/7
तन्वीला आजीसह आणखी एक खास सरप्राइझ बिग बॉसने दिलं आहे. ते म्हणजे तिचा आणि तिच्या बाबांचा फोटो असलेली मोठी फोटो प्रेम. जो पाहून तन्वी खूप इमोशनल होते. तन्वी हे आपल्याला मिळालेलं सगळ्यात मोठं गिफ्ट असल्याचं सांगत बिग बॉसचे आभार मानलेत.
advertisement
6/7
तन्वीला मिळालेलं हे गिफ्ट पाहून प्रेक्षकांचा मात्र जळफळाट झाला आहे. तन्वीलाच का? तिलाच का इतकी मोठी फोटो फ्रेम, इतर सदस्यांना का नाही? असा सवाल नेटिझन्सनी हा प्रोमो पाहिल्यावर केला आहे.
advertisement
7/7
तर काहींनी तन्वीची आजी आली, तिचे आईबाबा कुठे आहेत. फोटोत तिच्यासोबत फक्त तिचे बाबा आहे, तिच्या आईलाही पाहायचं आहे, असंही काही नेटिझन्सनी म्हटलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस'ने तन्वीला दिलं 'मोठं गिफ्ट', पाहून प्रेक्षकांची जळफळाट; विचारतायेत, 'हिलाच का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल