Bigg Boss Marathi 6 च्या घरात पहिल्याच दिवशी तुफान येणार, 17 स्पर्धकांची उडाली झोप
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात पहिल्याच दिवशी तुफान येणार आहे. सीझनच्या पहिल्याच दिवशी सर्व 17 स्पर्धकांसाठी घर बंद होणार आहे.
advertisement
1/7

'बिग बॉस मराठी 6'चा नुकताच ग्रँड प्रीमियर पार पडला असून रितेश देशमुखच्या उपस्थितीत एकूण 17 दमदार स्पर्धकांनी 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. यात दिपाली सय्यद, सागर कारंडे, सचिन कुमावत, सोनाली राऊत, तन्वी कोलते, आयुष संजीव, करण सोनावणे, प्रभु शेळके, प्राजक्ता शुक्रे, रुचिता जामदार, अनुश्री माने, राकेश बापट, रोशन भजनकर, दिव्या शिंदे, राधा पाटील, ओमकार राऊत, विशाल कोटीयन या जबरदस्त स्पर्धकांचा समावेश आहे.
advertisement
2/7
'बिग बॉस मराठी 6'च्या स्पर्धकांना घरात एन्ट्री करण्यापासूनच आपल्या खेळाला सुरुवात करावी लागली. घरात एन्ट्री करताना स्पर्धकांना 'शॉर्टकट दार' आणि 'मेहनतीचं दार' अशा दोन पर्यायांमधून एक दार निवडून घरात एन्ट्री करायची होती. इथेच खऱ्या अर्थाने स्पर्धकांचा गेम प्लॅन दिसून आला.
advertisement
3/7
'कलर्स मराठी'ने आता 'बिग बॉस मराठी सीझन 6'चा पहिला प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सीझनच्या पहिल्याच दिवशी 'बिग बॉस मराठी'च्या घरात तुफान येणार असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी 17 स्पर्धकांची झोपदेखील उडणार आहे.
advertisement
4/7
'बिग बॉस मराठी 6'च्या पहिल्या प्रोमोमध्ये घरातील मुख्यप्रवेशद्वाराजवळ गार्डन एरियामध्ये एक बझर ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. घरातील सदस्यांना हा बझर वाजवायचा टास्क होता. पण एकाही स्पर्धकाने बझर वाजवण्याचा प्रयत्न केला नाही".
advertisement
5/7
एकाही स्पर्धकाने बझर न वाजवल्याने पुढे 'बिग बॉस' म्हणत आहेत,"कोणीच बझर वाजवून तुफान थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे घर आपणा सर्वांसाठी बंद होत आहे". पहिल्याच दिवशी स्पर्धकांनी बिग बॉसचा आदेश न ऐकल्याने त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
advertisement
6/7
'बिग बॉस'ने पहिल्याच दिवशी 17 स्पर्धकांच्या डोळ्यासमोर घराचे दरवाजे बंद केले आहेत. प्रोमोमध्ये लिव्हिंग एरियामधील फ्लॅप्स क्लोज होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता घराचे दरवाजे बंद झाल्यावर स्पर्धक काय करणार? काय असेल 'बिग बॉस'चा पुढचा ट्विस्ट हे जाणून घेण्यासाठी आजचा एपिसोडच पाहावा लागेल.
advertisement
7/7
'बिग बॉस मराठी 6'चा खेळ आता 17 स्पर्धकांसोबत रंगणार आहे. 'दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार' अशी यंदाच्या सीझनची थीम आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 च्या घरात पहिल्याच दिवशी तुफान येणार, 17 स्पर्धकांची उडाली झोप