नेमकी घटना काय?
तक्रारदार केतन भास्करराव पवार यांच्यावर मुक्या प्राण्याला मारहाण करून अपंग करणे आणि सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि न्यायालयाकडून जामीन मिळावा यासाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी PSI दत्तात्रय गोडे आणि PSI अतुल क्षीरसागर यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली होती.
advertisement
शेवटी पुणेकर! पगारवाढ नाही, आयटी ॲडमिनने केलं असं, पुण्यातील बड्या शिक्षण संस्थेत खळबळ
विश्रामगृहाच्या मागे 'सापळा'
पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने लाचेची रक्कम स्वीकारण्याचे काम शासकीय विश्रामगृह (सिंहगड) येथील कॅन्टीन चालक रमेश आहिरे (61) आणि त्यांचा मुलगा कल्पेश आहिरे (28) यांनी स्वीकारले होते. एसीबीच्या पथकाने विश्रामगृहाच्या पाठीमागील भागात सापळा रचला होता. तक्रारदाराकडून दोन लाखांची रोकड स्वीकारताच या पिता-पुत्राला पथकाने बेड्या ठोकल्या.
पोलीस अधिकारीही आरोपीच्या पिंजऱ्यात
लाच स्वीकारणाऱ्या पिता-पुत्राने ही रक्कम PSI गोडे आणि PSI क्षीरसागर यांच्यासाठी घेतल्याचे कबूल केले. लाचखोरीला प्रोत्साहन देणे आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपअधीक्षक एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहते. नाशिक एसीबीच्या या धडक कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.






