Deepika Padukone Carrier: “दीपिका पादुकोण अभिनेत्री नसती तर...”, रणवीर सिंहच्या समोर एकदाचं सांगून टाकलं
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिला काही विशेष ओळखीची गरज नाही. आपल्या दमदार अभिनयाच्या आणि निखळ सौंदर्याच्या माध्यमातून दीपिकाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या दीपिकाने तिच्या करियरबद्दल भाष्य केले. जर ती अभिनेत्री नसती तर तिने कोणतं करियर निवडलं असतं? या प्रश्नावर भाष्य केले.
advertisement
1/5

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण सध्या मातृत्व अनुभवत आहे. 2018 साली रणवीर सिंह सोबत लग्नगाठ बांधल्यानंतर लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका- रणवीर आई- बाबा झाले. सप्टेंबर 2024 मध्ये दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून जिचं नाव या कपलने दुआ असं ठेवलं. दीपिका आई झाल्यानंतर कोणत्याही चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाही.
advertisement
2/5
सध्या दीपिका- रणवीर एका इंटरव्ह्यू मुळे चर्चेत आहेत. दीपिकाने स्वत: विषयीचा एका मुलाखतीमध्ये रंजक किस्सा उलगडला आहे. जो ऐकूनच चाहते थक्क झाले आहेत. जर दीपिका, अभिनेत्री नसती तर कोणत्या क्षेत्रात तिने तिचं करियर केलं असतं? याचा उलगडा केला आहे. दीपिकाने हा खुलासा रणवीरच्या समोरच केला आहे.
advertisement
3/5
मुलाखतीत दीपिका पादुकोनने उत्तर देताना सांगितलं की, "मी अभिनेत्री नसते तर, इंटिरीयर डिझायनर असते. पण माझा नवरा म्हणतो की, मी वकील असते." मनोरंजक म्हणजे, मी माझ्या 20 वर्षांच्या फिल्मी करियरमध्ये केव्हाही कोणत्याही वकिलाची भूमिका साकारलेली नाही. पण तरीही त्याला असं वाटतं की, मी वकील उत्तम पद्धतीने झाले असते.
advertisement
4/5
दीपिका पदुकोणने मॉडेलिंगच्या माध्यमातून ग्लॅमर जगतात एन्ट्री घेतली. डेन्मार्कमध्ये जन्मलेली दीपिकाचं बालपण बेंगळुरूमध्ये गेलं. तिने तिथे बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर तिने पदवीचं शिक्षण घेण्यासाठी IGNOU (Indira Gandhi National Open University) मध्ये प्रवेश घेतला. पण तिने नंतर आपलं शिक्षण अर्धवट सोडून मॉडेलिंगची वाट धरली.
advertisement
5/5
दीपिकाने 2006 साली रिलीज झालेल्या 'ऐश्वर्या'या कन्नड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 2007 मध्ये सुपरहिट "ओम शांती ओम" चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ही अभिनेत्री पुढे "किंग" चित्रपटात दिसणार आहे. तिच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत दीपिकाने पद्मावत, बाजीराव मस्तानी, पठाण, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू इयर आणि फायटर यासह अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Deepika Padukone Carrier: “दीपिका पादुकोण अभिनेत्री नसती तर...”, रणवीर सिंहच्या समोर एकदाचं सांगून टाकलं