TRENDING:

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मोठी दुर्घटना, बोगद्याजवळ गॅस लिकमुळे भीतीचं वातावरण; वाहतूक थांबवली, PHOTOS

Last Updated:
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी दुर्घटना घडली आहे. आडोशी बोगद्याजवळ एक टँकर पलटी झाला आहे. टँकरमध्ये गॅस लिक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तातडीने मुंबई -पुणे एक्स्प्रेसवरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. (गणेश दुडम आणि अनिस शेख, प्रतिनिधी)
advertisement
1/7
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मोठी दुर्घटना, बोगद्याजवळ गॅस लिकमुळे भीतीचं वातावरण
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी दुर्घटना घडली आहे. आडोशी बोगद्याजवळ एक टँकर पलटी झाला आहे. टँकरमध्ये गॅस लिक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तातडीने मुंबई -पुणे एक्स्प्रेसवरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. गॅस लिंक होत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
advertisement
2/7
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ संध्याकाळी सव्वा वाजेच्याा सुमारास ही घटना घडली. भरधाव वेगात जाणारा टँकर अचानक पलटी झाला.
advertisement
3/7
उतार असल्यामुळे टँकर अनियंत्रित झाला आणि बोगद्याजवळच पलटी झाला. टँकर पलटी झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. पण, काही क्षणात टँकरमधून गॅस लिक होत असल्याचं लक्षात आलं.
advertisement
4/7
टँकरमध्ये प्रोपोलिन गॅस असून तो लिक झाला आहे. त्यामुळं मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे.
advertisement
5/7
टँकरमध्ये प्रोपोलिन गॅस आहे, हा गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे वेळीच खबरदारी घेऊन वाहतूक पोलिसांनी लेनची वाहतूक थांबवली.
advertisement
6/7
ज्याा ठिकाणी टँकर पलटी झाला तिथून काही अंतरावर वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या.
advertisement
7/7
टँकर बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व खबरदारी घेऊन टँकर बाजूला केला जात आहे. टँकर पलटी झाल्यामुळे मात्र दूरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मोठी दुर्घटना, बोगद्याजवळ गॅस लिकमुळे भीतीचं वातावरण; वाहतूक थांबवली, PHOTOS
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल