'उद्या कोणी मला विचारलं...', गौरव मोरेने का सोडली 'हास्यजत्रा'? पहिल्यांदाच सांगितलं खरं कारण, ओंकार भोजनेबद्दल केलं मोठं विधान!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Gaurav More: 'गौरव मोरेने अचानक हास्यजत्रा का सोडली?' हा प्रश्न गेले अनेक महिने चाहत्यांना सतावत होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर खुद्द गौरवनेच दिलं आहे.
advertisement
1/7

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम आणि त्यातील कलाकार आज घराघरात पोहोचले आहेत. पण जेव्हा गौरव मोरे याने अचानक हास्यजत्रा सोडली, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
advertisement
2/7
"ज्या शोने ओळख दिली, तोच शो गौरवने का सोडला?" हा प्रश्न गेले अनेक महिने चाहत्यांना सतावत होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर खुद्द गौरवनेच दिलं असून, त्याने सिनेसृष्टीतील टाईपकास्ट होण्याच्या भीतीवर सडेतोड भाष्य केलं आहे.
advertisement
3/7
नुकत्याच एका युट्युब मुलाखतीत गौरव मोरेने मनातील खदखद बोलून दाखवली. गौरव म्हणाला, "ते म्हणायला लागले, तुमचं काम शो सारखंच होतंय आणि मला रोल पण तसेच यायला लागले. एक येतो आणि म्हणतो, 'हॅलो...तुमचा रोल मस्तय. तुम्ही येता...मग कॉमेडी होते आणि मग तुम्ही खूप कॉमेडी करता. काय करायचं मी?"
advertisement
4/7
गौरव पुढे म्हणाला, "ते विचारायचे, सर, तुम्ही या तारखेला आहात का? तुमच्यासाठी एक मस्त रोल आहे. हिरो आणि हिरोईन असतात, त्यांच्यामध्ये तुम्ही येता, त्यांच्या घरात प्रॉब्लेम होतात. तुम्ही येता आणि मग कॉमेडी होते. तेच सारखं सारखं व्हायला लागलं. मला वाटलं, आपण ब्रेक घ्यायला पाहिजे आणि म्हणून मी थांबलो. वर्षभर मी काहीच केलं नाही. फक्त 'मॅडनेस मचायेंगे' चे एपिसोड केलेले कारण, मला हिंदीतून बोलावलेलं. बाकी मला हे नाही करायचं, असं माझं काहीच नव्हतं."
advertisement
5/7
गौरवने स्पष्ट केलं की, त्याला कामाचा कंटाळा आला नव्हता, तर कामातील साचेबद्धपणा नको होता. याच मुलाखतीत जेव्हा गौरवला त्याचा सहकारी आणि मित्र ओंकार भोजनेबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्याने ओंकारचं तोंडभरून कौतुक केलं.
advertisement
6/7
गौरव म्हणाला, "ओंकार हा निव्वळ हिरा आहे. त्याच्यासारखा कसलेला नट सध्या तरी कोणी नाही आणि मला खात्री आहे की, पुढच्या १०-१५ वर्षांत त्याच्या ताकदीचा अभिनेता सिनेसृष्टीत येणार नाही." या विधानावरून या दोन अवलिया कलाकारांमधील मैत्री आणि एकमेकांबद्दलचा आदर पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
advertisement
7/7
गौरव मोरे फक्त विनोदी अभिनेता म्हणून मर्यादित राहू इच्छित नाही. त्याने आपल्या भविष्यातील ध्येयाबद्दल बोलताना सांगितलं की, त्याला राष्ट्रीय पुरस्कार जिंकायचा आहे. "मला तो सन्मान मिळवायचा आहे आणि तो फोटो घरात फ्रेम करून लावायचा आहे. उद्या जर कोणी मला विचारलं की तू आयुष्यात काय कमावलंस? तर मी त्याला त्या फोटोपाशी नेऊन उभा करेन," असं गौरवने आत्मविश्वासाने सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'उद्या कोणी मला विचारलं...', गौरव मोरेने का सोडली 'हास्यजत्रा'? पहिल्यांदाच सांगितलं खरं कारण, ओंकार भोजनेबद्दल केलं मोठं विधान!