ग्रहांच्या राजाची होणार कुंभ राशीत एंट्री! 'ही' तारीख ठरणार टर्निंग पॉईंट, 'या' 6 राशींच्या लोकांची होणार जबरदस्त ग्रोथ
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
सूर्याच्या या राशी परिवर्तनाला 'कुंभ संक्रांत' असेही म्हटले जाते. सूर्याचा हा गोचर प्रवास 12 राशींवर परिणाम करणारा असला, तरी या 6 राशींच्या जातकांसाठी हा काळ आयुष्यातील सर्वात मोठा 'टर्निंग पॉईंट' ठरू शकतो.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य 13 फेब्रुवारी 2026 रोजी मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या राशी परिवर्तनाला 'कुंभ संक्रांत' असेही म्हटले जाते. सूर्याचा हा गोचर प्रवास 12 राशींवर परिणाम करणारा असला, तरी या 6 राशींच्या जातकांसाठी हा काळ आयुष्यातील सर्वात मोठा 'टर्निंग पॉईंट' ठरू शकतो.
advertisement
2/7
मेष - अचानक धनलाभाचे योग: सूर्याचे हे संक्रमण मेष राशीच्या अकराव्या भावात होणार आहे. यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. गेल्या अनेक महिन्यांपासून अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. शेअर बाजार किंवा लॉटरीतून अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
मिथुन - परदेश प्रवासाच्या संधी: तुमच्या नवव्या भावात सूर्याचे आगमन होत आहे. यामुळे नशिबाचा जोर वाढेल. जे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छितात, त्यांच्यासाठी हा काळ टर्निंग पॉईंट ठरेल. धार्मिक कार्यात तुमची ओढ वाढेल आणि समाजात मानसन्मान मिळेल.
advertisement
4/7
सिंह - करिअरमध्ये मोठी पदोन्नती: सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्य आहे. सप्तम भावात सूर्याचे येणे तुमच्या भागीदारी व्यवसायासाठी आणि नोकरीसाठी फायदेशीर ठरेल. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळेल, जी तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरेल. मात्र, वैवाहिक वादापासून दूर राहावे.
advertisement
5/7
तूळ - वैयक्तिक प्रगती आणि यश: सूर्याचे हे भ्रमण तुमच्या पाचव्या भावात होणार आहे. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. जे लोक कला, क्रीडा किंवा राजकारण क्षेत्रात आहेत, त्यांना मोठे व्यासपीठ मिळेल. तुमची निर्णयक्षमता सुधारेल, ज्यामुळे आर्थिक लाभ होतील.
advertisement
6/7
धनु - धाडसात वाढ आणि नवीन प्रकल्प: सूर्याचे संक्रमण तुमच्या तिसऱ्या भावात होणार आहे. तुमचे धाडस वाढेल आणि तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचे धाडस कराल. भावा-बहिणींचे सहकार्य लाभेल. छोट्या प्रवासातून मोठा आर्थिक फायदा होण्याचे संकेत आहेत.
advertisement
7/7
कुंभ - व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल: सूर्य तुमच्याच राशीत प्रवेश करत आहे. हा तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने टर्निंग पॉईंट असेल. तुमचा आत्मविश्वास शिखरावर असेल. अनेक दिवसांपासून रखडलेली सरकारी कामे मार्गी लागतील. आरोग्यात सुधारणा होईल आणि तुम्ही एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून समोर याल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ग्रहांच्या राजाची होणार कुंभ राशीत एंट्री! 'ही' तारीख ठरणार टर्निंग पॉईंट, 'या' 6 राशींच्या लोकांची होणार जबरदस्त ग्रोथ