TRENDING:

अनेकवेळा पाहिलं असेल महाभारत, तरीही सांगता येणार नाही अर्जुनाच्या शंखाचं नाव; तुम्हाला माहिती आहे का?

Last Updated:
भारतीय संस्कृतीतील अजरामर महाकाव्य म्हणजे 'महाभारत'. हे केवळ एक युद्ध नसून धर्म आणि अधर्मातील मोठा संघर्ष होता. महाभारताच्या रणसंग्रामात जेव्हा युद्धाची घोषणा झाली, तेव्हा प्रत्येक योद्ध्याने आपापल्या शंखाचा नाद करून शत्रूला आव्हान दिले होते.
advertisement
1/7
अनेकवेळा पाहिलं असेल महाभारत, तरीही सांगता येणार नाही अर्जुनाच्या शंखाचं नाव
भारतीय संस्कृतीतील अजरामर महाकाव्य म्हणजे 'महाभारत'. हे केवळ एक युद्ध नसून धर्म आणि अधर्मातील मोठा संघर्ष होता. महाभारताच्या रणसंग्रामात जेव्हा युद्धाची घोषणा झाली, तेव्हा प्रत्येक योद्ध्याने आपापल्या शंखाचा नाद करून शत्रूला आव्हान दिले होते. यामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाच्या शंखाचा नाद ऐकून शत्रूच्या सैन्यात धडकी भरली होती.
advertisement
2/7
महाभारताची सुरुवात: महाभारताच्या युद्धाची बीजे हस्तिनापूरच्या सिंहासनावरून पेरली गेली. धृतराष्ट्र आणि पांडू यांच्या पुत्रांमधील सत्तेचा संघर्ष, शकुनी मामाचे कुटिल डाव आणि द्युतामध्ये पांडवांचा झालेला पराभव यामुळे या महायुद्धाची ठिणगी पडली. पांडवांना 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला, तरीही कौरवांनी 'सुईच्या टोकाएवढी' जमीन देण्यास नकार दिला.
advertisement
3/7
श्रीकृष्णाचे मध्यस्थी प्रयत्न: भगवान श्रीकृष्णाने स्वतः शांतीदूत बनून युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दुर्योधनाला केवळ पाच गावे पांडवांना देण्याची विनंती केली. परंतु, दुर्योधनाच्या अहंकारामुळे हा प्रस्ताव फेटाळला गेला आणि कुरुक्षेत्राच्या मैदानावर 18 दिवसांचे भीषण युद्ध अटळ झाले.
advertisement
4/7
अर्जुनाच्या शंखाचे नाव: कौरवांच्या विरोधात शंखनाद करताना अर्जुनाने जो शंख फुंकला होता, त्याचे नाव 'देवदत्त' होते. हा शंख अर्जुनाला वरुणदेवाने अग्निदेवाच्या माध्यमातून दिला होता. जेव्हा अर्जुनाने खांडववन दहनात अग्नीची मदत केली, तेव्हा प्रसन्न होऊन त्याला गांडीव धनुष्य आणि हा दिव्य 'देवदत्त' शंख प्राप्त झाला होता.
advertisement
5/7
युद्धाचा थरार आणि गीतोपदेश: कुरुक्षेत्रावर आपल्याच नातेवाईकांना समोर पाहून अर्जुन युद्धापूर्वी विचलित झाला होता. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला 'श्रीमद्भगवद्गीता' सांगितली. या उपदेशानंतर अर्जुनाने आपल्या 'देवदत्त' शंखाचा भीषण नाद करून युद्धाला सुरुवात केली. हा नाद इतका शक्तिशाली होता की त्याने आकाश आणि पृथ्वी दुमदुमून गेली होती.
advertisement
6/7
महाभारताचा अंत: 18 दिवस चाललेल्या या युद्धात भीष्म, द्रोण, कर्ण यांसारखे महान योद्धे धारातीर्थी पडले. युद्धाच्या शेवटी भीम आणि दुर्योधन यांच्यातील गदायुद्धात दुर्योधनाचा मृत्यू झाला. अधर्माचा पराभव झाला आणि पांडवांनी विजय मिळवला. मात्र, या विजयाची किंमत खूप मोठी होती, कारण दोन्ही बाजूंचे कोट्यवधी सैनिक आणि संपूर्ण कुरुवंश संपला होता.
advertisement
7/7
विजयानंतरचा प्रवास: युद्धाचा शेवट विजयाने झाला तरी पांडवांच्या मनात विजयाचा आनंद नव्हता, तर स्वकीयांच्या मृत्यूचे दुःख होते. शेवटी, युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला आणि 36 वर्षांच्या राज्यकारभारानंतर पांडव द्रौपदीसह हिमालयात स्वर्गाच्या प्रवासासाठी निघून गेले. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
अनेकवेळा पाहिलं असेल महाभारत, तरीही सांगता येणार नाही अर्जुनाच्या शंखाचं नाव; तुम्हाला माहिती आहे का?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल