TRENDING:

Amitabh Bachchan : 'याआधी जे लिहिलं ते...', 'त्या' पोस्टबाबत बिग बी अमिताभ बच्चन पहिल्यांदाच बोलले

Last Updated:
Amitabh Bachchan Post : बिग बी अमिताभ बच्चन यांच्या पोस्ट क्रिप्टिक असतात, ज्या कुणालाच समजत नाही. याआधी केलेल्या त्यांच्या पोस्टबाबत ते पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत.
advertisement
1/5
'याआधी जे लिहिलं ते...', 'त्या' पोस्टबाबत बिग बी अमिताभ बच्चन पहिल्यांदाच बोलले
बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. एक्स या सोशल मीडियावर ते पोस्ट करत असतात, शिवाय ब्लॉगही लिहितात. अमिताभ यांच्या बहुतेक पोस्ट अशा असतात, ज्यांचा अर्थच समजत नाही. आपल्या अशाच क्रिप्टिक पोस्टबाबत अमिताभ बच्चन पहिल्यांदाच बोलले आहेत.
advertisement
2/5
अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग लिहिला आहे. ज्याची सुरुवात त्यांनी अशी केली आहे की, "याआधी जे लिहिलं ते सगळं बाऊन्स झालं, हो साहेब ते बाऊन्स झालं" सोबत हसणारा इमोजी शेअर केला आहे.
advertisement
3/5
अमिताभ बच्चन पुढे लिहितात," जे सांगितलं होतं ते कुणालाही समजलं नाही. चांगलं आहे. काही गोष्टी लोकांना समजावून सांगितल्या तरी समजत नाहीत. जग असंच आहे. ते जाऊ द्या."
advertisement
4/5
त्यानंतर ते म्हणाले, "तुम्ही कधीही सर्वात हुशार, सर्वात ज्ञानी किंवा सर्वात यशस्वी व्यक्ती होऊ शकत नाही. तुमच्यापेक्षा नेहमीच कोणीतरी चांगले असेल. हे जाणून घ्या, ते स्वीकारा आणि शिकत राहा जेणेकरून तुम्ही पुढे जाल"
advertisement
5/5
"दुसऱ्याच्या आयुष्यात घुसून काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न करून नका. ते कधीही तुमचं स्वतःचं असू शकत नाही. त्यापेक्षा स्वतःवर काम करणं चांगलं. तुमच्या स्वतःच्या क्षमतेला ओळखा आणि तुमच्या शरीराला त्याच्या पूर्ण मर्यादेपर्यंत ढकलण्याचा प्रयत्न करा, जे कधीच पूर्णपणे साध्य होत नाही, असा सल्ला त्यांनी दिला आहे. तसं व्वा! आपण किती सुंदर जगात राहतो." असं म्हणत ब्लॉगचा शेवट केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Amitabh Bachchan : 'याआधी जे लिहिलं ते...', 'त्या' पोस्टबाबत बिग बी अमिताभ बच्चन पहिल्यांदाच बोलले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल