TRENDING:

कोणाला चुकीचा स्पर्श तर कोणी काढली छेड; बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री झाल्या लैंगिक शोषणाच्या शिकार

Last Updated:
सध्या कोलकत्यात झालेल्या बलात्कार प्रकरणावर देशवासी संताप व्यक्त करत आहेत. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी देखील याविषयी पोस्ट शेअर केल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्रींची ओळख करून देणार आहोत ज्यांनी कोवळ्या वयात त्या वेदना सहन केल्या आहेत.
advertisement
1/8
कंगना ते दीपिका; बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री झाल्या लैंगिक शोषणाच्या शिकार
आज आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्रींची ओळख करून देणार आहोत ज्यांनी कोवळ्या वयात त्या वेदना सहन केल्या आहेत.
advertisement
2/8
या यादीत पहिले नाव आहे बॉलिवूडची बंगाली ब्युटी बिपाशा बसू हिचं. तिने एकदा जेव्हा ती तिच्या एका चित्रपटादरम्यान एका नाईट क्लबमध्ये गेली होती तेव्हा तिथे काही लोकांनी तिचा विनयभंग केला होता असा खुलासा केला होता.
advertisement
3/8
अभिनेत्री कल्की कोचलिन बालपणात लैंगिक छळाची शिकार झाली आहे. खुद्द अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.
advertisement
4/8
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या या घटनेचा उल्लेख तिच्या पुस्तकात केला आहे. लहानपणी एका डॉक्टरने त्यांचा लैंगिक छळ केला होता' असं नीना गुप्ता म्हणाल्या आहेत.
advertisement
5/8
अभिनेत्री अदिती राव हैदरी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी या वेदनातून गेली आहे. अभिनेत्रीनं, एकदा एका मुलाने तिच्या पोटाला अनेक वेळा अयोग्य पद्धतीनं स्पर्श केला होता. यानंतर अभिनेत्रीने त्याला कानाखाली मारली होती असा खुलासा केला होता.
advertisement
6/8
बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पदुकोणचंही नाव या यादीत आहे. ती 14 वर्षांची असताना एका मुलाने तिचा विनयभंग केला होता.
advertisement
7/8
बॉलीवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूरलाही हा त्रास सहन करावा लागला आहे. जेव्हा अभिनेत्री 13 वर्षांची होती, तेव्हा एका व्यक्तीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला होता.
advertisement
8/8
अभिनेत्री सेलिना जेटलीने नुकताच खुलासा केला आहे की, जेव्हा ती सहावीत होती तेव्हा कॉलेजमधील अनेक मुले तिचा पाठलाग करायची. मग एके दिवशी एका मुलाने तिला त्याचे प्रायव्हेट पार्टही दाखवले. या घटनेसाठी अभिनेत्रीच्या शिक्षकाने तिलाच जबाबदार ठरवलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोणाला चुकीचा स्पर्श तर कोणी काढली छेड; बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री झाल्या लैंगिक शोषणाच्या शिकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल