TRENDING:

'आता मला हे नकोच', कठोर प्रयत्न करूनही मराठमोळ्या अभिनेत्रीची कूस रिकामीच! रागाच्या भरात घेतला मोठा निर्णय

Last Updated:
Neha Pendse on Motherhood: नेहाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, विशेषतः मातृत्व आणि फॅमिली प्लॅनिंगबद्दल जे भाष्य केलंय, ते ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.
advertisement
1/7
कठोर प्रयत्न करूनही अभिनेत्रीची कूस रिकामीच! रागाच्या भरात घेतला मोठा निर्णय
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा, 'मे आय कम इन मॅडम' फेम अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या तिच्या एका रोखठोक विधानामुळे चर्चेत आली आहे. नेहाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, विशेषतः मातृत्व आणि फॅमिली प्लॅनिंगबद्दल जे भाष्य केलंय, ते ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.
advertisement
2/7
लग्नाला ६ वर्ष उलटल्यानंतर नेहाने स्पष्ट केलं आहे की, तिला आता आई होण्याची कोणतीही इच्छा नाही. पण या निर्णयामागे एक वेदनादायी प्रवास आहे, जो तिने पहिल्यांदाच जगासमोर मांडला आहे.
advertisement
3/7
राजश्री मराठीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत नेहाने आपल्या मनातील कोपरा मोकळा केला. ती म्हणाली, "मला आता मूल नकोय. हा निर्णय मी एका रात्रीत घेतलेला नाही. लग्नानंतर एका विशिष्ट टप्प्यावर मला आई होण्याची तीव्र इच्छा होती. त्यासाठी मी खूप प्रयत्नही केले, पण दुर्दैवाने यश मिळालं नाही. त्या काळात मी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचले होते, प्रचंड निराश झाले होते."
advertisement
4/7
वयाच्या ४१ व्या वर्षी नेहाने हा निर्णय का घेतला? यावर तिने सांगितलं, "त्या अपयशानंतर मी इतकी वैतागले की मी स्वतःला सांगितलं, 'नाही, आता मला हे नकोच'. कदाचित तो राग असेल असं वाटून मी सावधगिरी म्हणून माझे Eggs फ्रीज करून ठेवले आहेत."
advertisement
5/7
नेहा पुढे म्हणाली, "भविष्यात जर कधी विचार बदलला तर मार्ग खुला असावा, हाच त्यामागचा उद्देश होता. पण सध्याच्या घडीला मला मुलाची कोणतीही जबाबदारी नकोय. मी हे इतक्या उघडपणे बोलतेय कारण माझ्यासारख्या अनेक स्त्रिया या मानसिक त्रासातून जात असतील, त्यांना कोणीतरी वास्तव सांगण्याची गरज आहे."
advertisement
6/7
२०२० मध्ये नेहाने व्यावसायिक शार्दुल बायससोबत लग्नगाठ बांधली. शार्दुलचं हे तिसरं लग्न होतं आणि त्याच्या आधीच्या दोन लग्नांपासून त्याला दोन मुली आहेत. नेहाचं तिच्या दोन्ही सावत्र लेकींसोबत अतिशय प्रेमाचं आणि मैत्रीचं नातं आहे. कदाचित या मुलींच्या रूपात तिला तिचं मातृत्वाचं सुख मिळालं असावं, असंही चाहत्यांना वाटतंय.
advertisement
7/7
नेहा पेंडसे सध्या पुन्हा एकदा मराठी इंडस्ट्रीत सक्रिय होताना दिसत आहे. 'जून' या चित्रपटानंतर तिने थोडा ब्रेक घेतला होता, पण आता ती काही नवीन प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. आपल्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखत असताना, तिने घेतलेला हा निर्णय चॉईस आणि मेंटल हेल्थ यावर भाष्य करणारा ठरला आहे.<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आता मला हे नकोच', कठोर प्रयत्न करूनही मराठमोळ्या अभिनेत्रीची कूस रिकामीच! रागाच्या भरात घेतला मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल