Dharmendra : 'ही-मॅन'च्या अभिनय प्रवासाचा गौरव! धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dharmendra Posthumously Padma Vibhushan : देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
advertisement
1/7

बॉलिवूडचे ही मॅन अभिनेते धर्मेंद्र यांचं काही दिवसांआधी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सगळेच धक्क्यात आहेत. संपूर्ण देओल कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
advertisement
2/7
अशातच देओल कुटुंबीय, बॉलिवूड आणि धर्मेंद्र यांच्या तमाम चाहत्यांसाठी एक आनंदाची माहिती समोर आली आहे. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
advertisement
3/7
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. साहित्य, कला, क्रिडा, सामाजिक अशा अनेक विभागांमध्ये पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
advertisement
4/7
भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदासाठी धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार देण्यात आला आहे.
advertisement
5/7
धर्मेंद्र यांच्याबरोबरच साराभाई वर्सेस साराभाई मालिकेतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते सतीश शाह यांनाही मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
advertisement
6/7
2025 वर्षाच्या शेवटची धर्मेंद्र आणि सतीश शाह या दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.
advertisement
7/7
अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dharmendra : 'ही-मॅन'च्या अभिनय प्रवासाचा गौरव! धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर