'एवढ्या खालच्या थराला जाऊन...', भव्या सिंगच्या 'त्या' वक्तव्यावर दिव्या अग्रवालची टीम संतापली; दिलं सडेतोड उत्तर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Divya Agrawal-Bhavya Singh Controversy: भव्याने नॅशनल टेलिव्हिजनवर दिव्याच्या संसाराबद्दल जे खालच्या स्तराचे वक्तव्य केले, त्यावर आता दिव्याच्या अधिकृत टीमने सडेतोड उत्तर देत भव्याला आरसा दाखवला आहे.
advertisement
1/8

रिअ‍ॅलिटी शो 'The 50' च्या महालात सध्या खेळापेक्षा जास्त चर्चा रंगतेय ती खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्याची. अभिनेत्री दिव्या अग्रवाल आणि भव्या सिंग यांच्यातील वाद आता केवळ शोपुरता मर्यादित राहिला नसून तो कायदेशीर लढाईच्या वळणावर येऊन पोहोचला आहे.
advertisement
2/8
भव्याने नॅशनल टेलिव्हिजनवर दिव्याच्या संसाराबद्दल जे खालच्या स्तराचे वक्तव्य केले, त्यावर आता दिव्याच्या अधिकृत टीमने सडेतोड उत्तर देत भव्याला आरसा दाखवला आहे.
advertisement
3/8
एका टास्कदरम्यान भव्याने दिव्यावर वैयक्तिक हल्ला चढवला. भव्या म्हणाली होती की, "हिच्या घरात दिवाळीला खरे फटाके फुटले होते आणि ते मी फोडलेत. ही आपल्या पतीपासून वेगळी राहतेय. मुंबईत ही लोकांच्या हातापाया पडते की माझ्या घरी या, माझ्याशी बोला. ही एकटी पडली आहे."
advertisement
4/8
भव्याने दिव्याच्या स्वभावाला एकटेपणाचं असं नाव देऊन तिच्या चारित्र्यावर आणि नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भव्याचं हे वागणं अनैतिक असल्याचं म्हणत दिव्याच्या टीमने सोमवारी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यात म्हटलंय...
advertisement
5/8
"The 50 हा खेळ ताकद, रणनीती आणि मानसिक क्षमतेचा आहे, वैयक्तिक चिखलफेक करण्यासाठी हा मंच नाही. वारंवार 'मी काही बोलणार नाही' असं म्हणायचं आणि मग दुसऱ्याच्या खासगी आयुष्याबद्दल बिनबुडाचे आरोप करायचे, यातून तुमची सत्यता नाही तर तुमची वाईट वृत्ती दिसून येते. कोणाच्या वैयक्तिक आयुष्याला अशा प्रकारे चर्चेत आणणं हे समोरच्या व्यक्तीपेक्षा ते बोलणाऱ्याच्या मानसिकतेवर जास्त प्रकाश टाकतं."
advertisement
6/8
दिव्याच्या टीमने तिच्या स्वभावाचा बचाव करताना म्हटलं की, दिव्याला लोकांना घरी बोलावणं, त्यांचं आदरातिथ्य करणं आणि नवीन नाती जोडणं आवडतं. हा तिचा मोकळा स्वभाव आहे, तिचा एकटेपणा नाही.
advertisement
7/8
"दिव्याचं पाहुणचार करण्याचं वेड हे तिच्या प्रेमळ स्वभावाचं लक्षण आहे. याला 'इमोशनल डिपेंडन्सी' म्हणणं हे केवळ चुकीचं नाही तर अत्यंत अन्यायकारक आहे. कोणाच्या चांगुलपणाचा चुकीचा अर्थ लावून त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही," असंही टीमने स्पष्ट केलं.
advertisement
8/8
या वादावर दिव्यानेही शोमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे. अर्चना गौतम आणि भव्याने जेव्हा तिला लक्ष्य केलं, तेव्हा डोळ्यांत पाणी आणून दिव्या म्हणाली, "प्रत्येक रिअ‍ॅलिटी शोमध्ये लोकांनी माझा तिरस्कार केला आहे. पण मी प्रत्येक वेळी एकटी लढले आणि जिंकले आहे." दिव्याचा हा आत्मविश्वास पाहून तिचे चाहते पुन्हा एकदा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'एवढ्या खालच्या थराला जाऊन...', भव्या सिंगच्या 'त्या' वक्तव्यावर दिव्या अग्रवालची टीम संतापली; दिलं सडेतोड उत्तर