TRENDING:

ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं, लवकरच अडकणार विवाहबंधनात, मेहंदी सोहळ्याचे PHOTO समोर

Last Updated:
Dnyanada Ramtirthkar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
advertisement
1/7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं, लवकरच अडकणार विवाहबंधनात PHOTOS
ज्ञानदा रामतीर्थकर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेच्या माध्यमातून ज्ञानदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत तिने साकारलेली काव्या ही भूमिका गाजत आहे. टीआरपीच्या शर्यतीत मालिका अव्वलस्थानी असताना ज्ञानदा आता लवकरच वैयक्तिक आयुष्य विवाहबंधनात अडकणार आहे.
advertisement
2/7
ज्ञानदा रामतीर्थकरने मेंहदीसोहळ्याची झलक व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. पण खरंतर ज्ञानदाची ही मेहंदी तिच्या साखरपुड्यासाठीही आहे. ज्ञानदाचा लवकरच साखरपुडा होणार आहे.
advertisement
3/7
ज्ञानदाने मेहंदीसोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती खूप आनंदी दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत ज्ञानदाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"मेहंदीने भरलेले हात. त्याने माझ्या हृदयात जागा निर्माण केली आहे".
advertisement
4/7
ज्ञानदाने कॅप्शनमध्ये #HD असंही लिहिलं आहे. त्यामुळे तिच्या होणाऱ्या पतीचं नाव H या अक्षरावरुन सुरू होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
advertisement
5/7
ज्ञानदाने 'ठरलं कळवतो लवकरच' असं म्हणत आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ज्ञानदाच्या हातावरील रंगलेली मेहंदी आणि हिरवा चुडा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये तिने #HD LOVE असं लिहिलं आहे.
advertisement
6/7
ज्ञानदाच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ज्ञानदाने चाहत्यांसोबत आता आनंदाची बातमी शेअर केली आहे. ज्ञानदाच्या या व्हिडीओवर सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
advertisement
7/7
ज्ञानदा रामतीर्थकरने जिंदगी नॉट आऊट, ठिपक्यांची रांगोळी, सख्या रे, शतदा प्रेम करावे अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम'च्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं, लवकरच अडकणार विवाहबंधनात, मेहंदी सोहळ्याचे PHOTO समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल