TRENDING:

Madhuri Dixit: घायाळ करणारी स्माईल, मनमोहक सौंदर्य; पण पहिल्या फिल्ममध्ये कशी दिसायची Mrs. Deshpande?

Last Updated:
Madhuri Dixit First Film Look: नुकतंच एका मुलाखतीत माधुरीने तिच्या संघर्षाच्या काळातील आठवणींना उजाळा दिला आहे. तिने अशा काही आठवणी सांगितल्या आहेत, ज्या ऐकून कोणालाही धक्का बसेल.
advertisement
1/9
घायाळ करणारी स्माईल, मनमोहक सौंदर्य; पण पहिल्या फिल्ममध्ये कशी दिसायची माधुरी?
माधुरी दीक्षित म्हणजे बॉलिवूडमधील सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक. तिने तिच्या कारकि‍र्दीत अनेकांना आपल्या सौंदर्याने घायाळ केलं आहे. इतकंच काय तर साठीमध्ये पोहोचलेली माधुरी आजही तितकीच सुंदर आहे.
advertisement
2/9
ब्यूटी आयकॉन मानली जाणारी माधुरी तरुणींसाठी एक आदर्श आहे. पण असे असूनही माधुरीला तिच्या करिअरच्या सुरूवातीला कडवट बोल ऐकावे लागले होते. नुकतंच एका मुलाखतीत माधुरीने तिच्या संघर्षाच्या काळातील आठवणींना उजाळा दिला आहे. तिने अशा काही आठवणी सांगितल्या आहेत, ज्या ऐकून कोणालाही धक्का बसेल.
advertisement
3/9
१७ व्या वर्षी तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. अबोध या सिनेमातून तिने इंडस्ट्रीमध्ये लीड हिरोईन म्हणून डेब्यू केलं. नवीन असल्यामुळे माधुरीला नको नको ते सल्ले आणि टोमणे ऐकावे लागले होते.
advertisement
4/9
ती म्हणाली, "मी जेव्हा नवीन होते, तेव्हा लोक मला म्हणायचे, 'अगं, तू हे असं कर, तू तसं कर... तुझं नाक कसं विचित्र आहे, तू किती बारीक आहेस!' अशा कमेंट्स ऐकून मी खूप अस्वस्थ व्हायचे." माधुरीचं नाक आणि शरीर यावरून तिला सतत हिणवलं जायचं.
advertisement
5/9
सततचे हे टोमणे ऐकून माधुरी रडत रडत आईकडे जायची. यावेळी आपल्या मुलीची समजूत घालणारी आई आपल्या मुलीला एकच मंत्र द्यायची. आई तिला म्हणायची, "या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ. तू फक्त तुझ्या कामावर लक्ष ठेव. ज्या दिवशी तुझा एखादा चित्रपट सुपरहिट होईल, त्या दिवशी याच लोकांना तुझ्यातल्या या उणिवा सर्वात जास्त आवडू लागतील."
advertisement
6/9
आईच्या या शब्दांनी माधुरीला हिंमत यायची आणि ती पुन्हा जोमाने आपल्या कामाला लागायची. अखेर १९८८ साली रिलीज झालेल्या तेजाब नंतर संपूर्ण देश माधुरीच्या 'एक दोन तीन'च्या तालावर नाचू लागलं.
advertisement
7/9
या एका सिनेमाने माधुरीला रातोरात स्टार बनवलं. जिला आधी तिच्या रुपावरून हिणवलं जात होतं, तिलाच तिच्या सौंदर्यासाठी लोकांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर कोणीही तिला तिचं नाक किंवा शरीर बदलण्याचा सल्ला दिला नाही.
advertisement
8/9
गेली अनेक दशकं बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या माधुरीने तिच्या अनुभवातून एक मोलाचा सल्ला दिला आहे. ती म्हणते, "कोणीतरी ठरवलेल्या साच्यात फिट होण्याचा प्रयत्न करू नका. हिरोईन म्हणजे अशीच दिसली पाहिजे, हे डोक्यातून काढून टाका. जर तुम्ही इतरांपेक्षा वेगळ्या दिसत असाल, तर तीच तुमची ताकद आहे. तुमच्यातील त्या वेगळेपणाचा अभिमान बाळगा आणि त्यावरच तुमचं करिअर घडवा."
advertisement
9/9
सध्या माधुरी दीक्षित एका वेगळ्याच भूमिकेमुळे चर्चेत आहे. नागेश कुकुनूर दिग्दर्शित 'मिसेस देशपांडे' या वेब सीरिजमध्ये माधुरी पहिल्यांदाच एका 'सिरीयल किलर'ची भूमिका साकारत आहे. जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होत असलेल्या या शोमध्ये माधुरीचा एक डार्क आणि थरारक चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आपल्या करिअरच्या या टप्प्यावर अशा आव्हानात्मक भूमिका मिळणं, हे आपल्यासाठी आनंदाचं असल्याचं माधुरीने सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Madhuri Dixit: घायाळ करणारी स्माईल, मनमोहक सौंदर्य; पण पहिल्या फिल्ममध्ये कशी दिसायची Mrs. Deshpande?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल