'चेहरा उतरलाय, केस कमी झालेत!' नशेत असलेल्या गोविंदाने सलमान खानला दाखवलेला आरसा, दुखावलेल्या भाईजानने केलं असं काही...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Govinda-Salman Khan: अनेकांना असं वाटतं की सलमान खानने गोविंदाला कमबॅक करण्यासाठी मदत केली, पण उलट गोविंदाने सलमान खानच्या करिअरमधला टर्निंग पॉईंट दिला आहे.
advertisement
1/8

बॉलीवूडमध्ये २००७ साली आलेल्या 'पार्टनर' चित्रपटाने इतिहास रचला होता. लव्ह गुरु 'प्रेम' आणि त्याचा साधाभोळा मित्र 'भास्कर' यांची जोडी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.
advertisement
2/8
पण या चित्रपटाच्या यशामागे आणि सलमान खानच्या त्या काळातील जबरदस्त फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनमागे एका व्यक्तीचा हात होता, तो म्हणजे चक्क गोविंदा. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने एक जुना किस्सा सांगितला.
advertisement
3/8
अनेकांना असं वाटतं की सलमान खानने गोविंदाला कमबॅक करण्यासाठी मदत केली, पण उलट, गोविंदानेच सोहेल खान आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांना असा सल्ला दिला होता की, सलमानला या चित्रपटात एका पूर्णपणे नवीन अवतारात सादर करायला हवं.
advertisement
4/8
"मी त्यांना म्हणालो होतो की, आपण एक नवा सलमान प्रेक्षकांसमोर आणूया. जो पूर्वी कधीच पाहिला नव्हता. आणि खरोखरच, 'पार्टनर'नंतर सलमानचा लूक इतका हिट झाला की त्याने पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही," असं गोविंदाने अभिमानाने सांगितलं.
advertisement
5/8
तो म्हणाला, "चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी सलमान माझ्याकडे आला आणि त्याने मला विचारलं की, करिअर आणि लूकसाठी मी नक्की काय करायला हवं? त्या दिवशी मी एक-दोन ड्रिंक्स घेतल्या होत्या, त्यामुळे नशेत मी खूप स्पष्ट बोललो."
advertisement
6/8
गोविंदा पुढे म्हणाला, "मी त्याला म्हणालो, सलमान, तुझा चेहरा थोडा उतरलाय, शरीर बेढब होतंय आणि तुझे केसही कमी होत आहेत. तुला यावर काम करावंच लागेल."
advertisement
7/8
गोविंदाने पुढे सांगितलं की, सलमानने त्याचं बोलणं अगदी सकारात्मकतेने घेतलं. त्याने केवळ व्यायामच केला नाही, तर काही वैद्यकीय शस्त्रक्रिया करून स्वतःचा लूक पूर्णपणे बदलून टाकला.
advertisement
8/8
मुलाखतीदरम्यान गोविंदाने सलमानच्या प्रामाणिकपणाचं भरभरून कौतुक केलं. तो म्हणाला, "सलमान खूप ईमानदार माणूस आहे. त्याने स्वतःहून सल्ला मागितला आणि मी दिलेला सडेतोड सल्ला मान्य करून त्यावर मेहनत घेतली. 'पार्टनर'च्या यशात त्याच्या या ट्रान्सफॉर्मेशनचा मोठा वाटा होता."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'चेहरा उतरलाय, केस कमी झालेत!' नशेत असलेल्या गोविंदाने सलमान खानला दाखवलेला आरसा, दुखावलेल्या भाईजानने केलं असं काही...