आधी त्रियुगीनारायण मंदिरात लग्न, आता उत्तराखंडच्या पर्वतरांगांमध्ये विशाल-अक्षयाचं रोमँटिक फोटोशूट; तुम्ही पाहिलं का?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Vishal Nikam-Akshaya Hindalkar Wedding: 'बिग बॉस मराठी ३'चा विजेता विशाल निकम अखेर बोहल्यावर चढला आहे. हे लग्न पार पडलंय उत्तराखंडच्या बर्फाच्छादित आणि अत्यंत पवित्र अशा त्रियुगीनारायण मंदिरात!
advertisement
1/8

मराठी मालिका </a>विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि 'बिग बॉस मराठी ३'चा विजेता विशाल निकम अखेर बोहल्यावर चढला आहे. पण हे लग्न एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये किंवा मुंबईच्या चकचकीत हॉलमध्ये झालं नाही, तर ते पार पडलंय उत्तराखंडच्या बर्फाच्छादित आणि अत्यंत पवित्र अशा त्रियुगीनारायण मंदिरात!" width="750" height="1000" /> मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि 'बिग बॉस मराठी ३'चा विजेता विशाल निकम अखेर बोहल्यावर चढला आहे. पण हे लग्न एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये किंवा मुंबईच्या चकचकीत हॉलमध्ये झालं नाही, तर ते पार पडलंय उत्तराखंडच्या बर्फाच्छादित आणि अत्यंत पवित्र अशा त्रियुगीनारायण मंदिरात!
advertisement
2/8
हे तेच ठिकाण आहे, जिथे पौराणिक कथांनुसार साक्षात भगवान शिव आणि माता पार्वतीने लग्नगाठ बांधली होती. त्याच अग्नीच्या साक्षीने विशालने आपली 'सौंदर्या' म्हणजेच अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिच्यासोबत सात फेरे घेतले आहेत.
advertisement
3/8
विशाल आणि अक्षयाने आपल्या लग्नाचा हा प्रवास खूपच साधेपणाने पण तितकाच अर्थपूर्ण ठेवला होता. सर्वात आधी त्यांनी हरिद्वारच्या गंगाघाटावर गंगेच्या पवित्र पात्राच्या साक्षीने साखरपुडा उरकला.
advertisement
4/8
त्यानंतर, १० फेब्रुवारीला विशालच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या जोडीने त्रियुगीनारायण मंदिराच्या प्रांगणात विवाह केला. विशालसाठी आपला वाढदिवस आणि लग्नाचा दिवस एकच असणं, हे दुग्धशर्करा योगापेक्षा कमी नव्हतं.
advertisement
5/8
विवाहसोहळ्यासाठी अक्षयाने अतिशय सुंदर असा केशरी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. केसांची लांबसडक वेणी, कपाळावर मुंडावळ्या आणि हातात पारंपरिक हिरव्या बांगड्यांचा चुडा... अक्षयाचा हा हटके लूक खूपच वेगळा होता.
advertisement
6/8
तर विशालनेही पारंपरिक वेशभूषेत आपला रांगडा बाणा जपला. या दोघांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहून त्यांच्या चाहत्यांचा आनंदही गगनात मावेनासा झाला होता.
advertisement
7/8
विशाल निकम जेव्हा 'बिग बॉस'च्या घरात होता, तेव्हा तो नेहमी एका 'सौंदर्या'बद्दल बोलायचा. ती सौंदर्या कोण, याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला होती. अखेर ती सौंदर्या दुसरी तिसरी कोणी नसून त्याची २०१९ मधील 'साता जल्माच्या गाठी' या मालिकेतील सहकलाकार अक्षया हिंदळकर असल्याचं आता स्पष्ट झालंय.
advertisement
8/8
योगायोगाने, आपल्या लग्नाचे फोटो शेअर करतानाही विशालने "साता जन्माच्या गाठी" असंच कॅप्शन दिलं आहे, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्या जुन्या मालिकेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आधी त्रियुगीनारायण मंदिरात लग्न, आता उत्तराखंडच्या पर्वतरांगांमध्ये विशाल-अक्षयाचं रोमँटिक फोटोशूट; तुम्ही पाहिलं का?