TRENDING:

Girija Oak : नवी साडी पण तेच आरसपानी सौंदर्य, गिरिजा ओकनं पुन्हा लावलं चाहत्यांना वेड, PHOTO

Last Updated:
अभिनेत्री गिरिजा ओकची नवी साडी आणि चाहत्यांना प्रेमात पाडणारं फोटोशूट समोर आलं आहे. गिरिजाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
1/7
नवी साडी पण तेच आरसपानी सौंदर्य, गिरिजा ओकनं पुन्हा लावलं चाहत्यांना वेड, PHOTO
नॅशनल क्रश गिरिजा ओक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गिरिजा आणि तिच्या साडीची संपूर्ण दुनिया फॅन झाली आहे. निळ्या साडीतील तिचे फोटो आजही सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत. अशातच गिरिजानं पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
advertisement
2/7
गिरिजा एका नव्या साडीत समोर आली आहे. नवी साडी असली तरी गिरिजाचं तेच आरसपानी सौंदर्य पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. गिरिजाचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
3/7
गिरिजाने फिकट तपकिरी म्हणजेच बेज रंगाची साडी नेसली आहे. हा सौम्य आणि क्लासी रंग तिच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी साजेसा वाटतो. कोणताही भडकपणा न करता साडीमध्येही गिरिजाचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. साडीचा साधेपणा आणि तिचा आत्मविश्वास यामुळे हा लूक अधिक आकर्षक ठरतो.
advertisement
4/7
या साडीवर गिरिजाने घातलेले दागिने तिच्या लूकला आणखी चार चांद लावत आहेत. तिने गळ्यात वेगवेगळे नेकलेस  घातले आहेत. एक व्हाइट मोती नेकलेस, त्यासोबत ग्रीन स्टोन असलेला नेकलेस आणि ग्रीन, रेड, व्हाइट रंगांच्या छोट्या खड्यांच्या माळा तिने एकत्र परिधान केल्या आहेत. हे सगळे नेकलेस एकमेकांशी सुंदरपणे जुळून आले असून, संपूर्ण लूकला पारंपरिक पण ट्रेंडी टच देत आहेत.
advertisement
5/7
गिरिजा ओक नेहमीच तिच्या साध्या पण प्रभावी स्टाइलसाठी ओळखली जाते. फार हेवी मेकअप किंवा ओव्हरड्रेसिंग न करता नैसर्गिक लूकमध्ये ती अधिक खुलून दिसते. या लूकमध्येही तिचं सौम्य हास्य, आत्मविश्वास आणि नॅचरल चार्म पुन्हा चाहत्यांना वेड लावतोय.
advertisement
6/7
एका चाहत्यानं लिहिलंय, "निखळ, आरसपानी सौंदर्य". दुसऱ्यानं लिहिलंय, "क्या चाहते हो आप हम धरती छोड़ कर चले जाए". तिसऱ्यानं लिहिलंय, "तुला पुरुषांची सायकोलॉजी बरोबर कळते." आणखी एकानं लिहिलंय, "खऱ्या अर्थाने सौंदर्य म्हणजे गिरिजा. साधेपणातली राणी."
advertisement
7/7
नव्या साडीत, साध्या दागिन्यांत आणि तेच आरसपानी सौंदर्य घेऊन गिरिजा ओकनं पुन्हा एकदा चाहत्यांना वेड लावलं आहे. फॅशन असो किंवा व्यक्तिमत्त्व, गिरिजा ओक प्रत्येक वेळी आपली वेगळी छाप पाडते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Girija Oak : नवी साडी पण तेच आरसपानी सौंदर्य, गिरिजा ओकनं पुन्हा लावलं चाहत्यांना वेड, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल