TRENDING:

Weather Alert: स्वेटर काढा, आता AC जोडा! महाराष्ट्रात वारं फिरलं, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. 23 जानेवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
स्वेटर काढा, आता AC जोडा! महाराष्ट्रात वारं फिरलं, हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात हिवाळ्याचा शेवट जवळ येत असताना हवामानात सतत बदल जाणवत आहेत. काही भागांत सकाळी थोडासा गारवा टिकून आहे, तर दुपारच्या वेळेत उष्णतेचा प्रभाव वाढताना दिसत आहे. किमान तापमानात वाढ होत असल्याने थंडीचा कडाका आता बऱ्याच अंशी कमी झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे आणि स्थिर राहणार आहे. आज, 24 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील हवामान कसं असणार आहे? जाणून घेऊ. चला तर जाणून घेऊया, आज म्हणजेच 24 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील हवामान कसं असणार आहे
advertisement
2/5
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात हवामान मुख्यतः निरभ्र ते अंशतः ढगाळ राहील. सकाळच्या वेळेत हलके धुके जाणवू शकते, मात्र दिवसभर हवामान कोरडे राहणार आहे. कमाल तापमान 24 ते 28 अंश सेल्सियस दरम्यान तर किमान तापमान 18 ते 23 अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे. थंडीचा प्रभाव कमी असून दुपारच्या वेळी हलकी उष्णता जाणवू शकते.
advertisement
3/5
पश्चिम महाराष्ट्रात सूर्यप्रकाशयुक्त आणि कोरडे हवामान राहील. पुणे आणि परिसरात थंडी कमी जाणवणार असून किमान तापमानात वाढ होत आहे. या भागात कमाल तापमान 28 ते 32 अंश सेल्सियस, तर किमान 14 ते 18 अंश सेल्सियस दरम्यान राहील. ग्रामीण भागात सकाळी हलका गारवा आणि दुपारी उष्णतेचा अनुभव येऊ शकतो.
advertisement
4/5
नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील आणि तापमान सामान्यपेक्षा किंचित जास्त राहणार आहे. मराठवाड्यात (छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, नांदेड) थंडीचा प्रभाव आणखी कमी होईल. विदर्भातही हवामान स्थिर राहील. या सर्व भागांत कमाल तापमान 28 ते 32 अंश आणि किमान तापमान 13 ते 18 अंश सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी सकाळी हलके धुके पडू शकते.
advertisement
5/5
एकंदरीत राज्यात पुढील काही दिवस हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. थंडी हळूहळू कमी होत जाईल आणि दिवसेंदिवस उष्णता वाढताना दिसेल. सकाळी धुके पडण्याची शक्यता लक्षात घेता वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी. एकूणच, हिवाळ्याची तीव्रता कमी होत असून उबदार हवामानाकडे राज्याची वाटचाल सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: स्वेटर काढा, आता AC जोडा! महाराष्ट्रात वारं फिरलं, हवामान विभागाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल