TRENDING:

Pune News: ते गावातील मंदिर शोधायचे, मध्यरात्रीची वेळ गाठायचे अन् मग कांड; 'त्या' 8 घटनांनी पुण्यात उडवली खळबळ, शेवटी...

Last Updated:

हे दिवसा गावागावात फिरून मंदिरांची रेकी करायचे. एखादे शांत आणि गर्दी नसलेले मंदिर शोधल्यानंतर, मध्यरात्रीची वेळ गाठून तेथील दानपेट्या फोडायचे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायणगाव : जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांतील विविध मंदिरांना लक्ष्य करून दानपेट्यांवर डल्ला मारणाऱ्या एका अट्टल टोळीचा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या टोळीने मागील दोन महिन्यांत तब्बल आठ प्रसिद्ध मंदिरांमध्ये चोऱ्या करून भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण केले होते. पोलिसांनी दोन चोरट्यांना शिताफीने अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चोरीची अजब घटना (प्रतिकात्मक फोटो)
चोरीची अजब घटना (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

अटक करण्यात आलेले आरोपी सुनील सुरेश आगिवले (वय २०) आणि भिमा भाऊसाहेब गिन्हे (वय २६, दोन्ही रा. अहिल्यानगर) हे दिवसा गावागावात फिरून मंदिरांची रेकी करायचे. एखादे शांत आणि गर्दी नसलेले मंदिर शोधल्यानंतर, मध्यरात्रीची वेळ गाठून तेथील दानपेट्या फोडायचे. केवळ रोख रक्कमच नाही, तर सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान साहित्यावरही हे चोरटे हात साफ करायचे.

advertisement

'या' आठ मंदिरांमध्ये घातला धुमाकूळ

तपासादरम्यान या जोडगोळीने आळे येथील श्री खंडोबा मंदिर, शिरोलीचे श्री भैरवनाथ मंदिर, नारायणगावचे श्री साईबाबा मंदिर, नळवणे येथील खंडोबा मंदिर, मंचरजवळील कळंबा माता मंदिर, जुन्नर घालेवाडी येथील श्री शिवशंभू मंदिर आणि रांजणगाव गणपती परिसरातील श्री सोमेश्वर मंदिरातील दानपेट्या फोडल्याची कबुली दिली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उलथापालथ, कांदा आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

सध्या यात्रांचा मोसम असल्याने मंदिरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. याची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी कांदळी फाटा परिसरात सापळा लावून या दोघांना जेरबंद केले. या कारवाईमुळे मंदिर परिसरात पुन्हा एकदा सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune News: ते गावातील मंदिर शोधायचे, मध्यरात्रीची वेळ गाठायचे अन् मग कांड; 'त्या' 8 घटनांनी पुण्यात उडवली खळबळ, शेवटी...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल