TRENDING:

Guess Who : 18व्या वर्षी डेब्यू, ॲक्टर्सच नाही तर 2 क्रिकेटरसोबत जोडलं नाव, राजघराण्यातील अभिनेत्री कुठे गायब झाली?

Last Updated:
Guess Who: आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिने अवघ्या १८ व्या वर्षी रुपेरी पडद्यावर प्रवेश केला. तुम्ही या अभिनेत्रीला ओळखले का?
advertisement
1/11
18व्या वर्षी डेब्यू, क्रिकेटरसोबत जोडलं नाव, राजघराण्यातील अभिनेत्री झाली गायब
चित्रपट विश्वात आपला ठसा उमटवण्यासाठी अनेक अभिनेत्री खूप मेहनत घेतात. पण प्रत्येकाला यशाची चव चाखायला मिळेलच याची शाश्वती नाही. हिंदी चित्रपटांसोबतच अनेक अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपले नशीब आजमावतात, मात्र असे असूनही त्यांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता येत नाही. मग इंडस्ट्रीत त्यांचे कितीही नातेवाईक का असोना. आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिने अवघ्या १८ व्या वर्षी रुपेरी पडद्यावर प्रवेश केला. तुम्ही या अभिनेत्रीला ओळखले का?
advertisement
2/11
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रिया सेन आहे. रिया सेनने १९९९ मध्ये भारतीराजा दिग्दर्शित 'ताजमहाल' चित्रपटात काम केले होते, तेव्हा ती फक्त १८ वर्षांची होती. आज ती ४४ वर्षांची आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी फिल्मी दुनियेत प्रवेश केलेल्या रिया सेनने आपला ठसा उमटवला.
advertisement
3/11
'नेपोटिझम' हा शब्द आजकाल खूप ऐकायला मिळतो. फिल्मी दुनियेत स्टार किड्सचा दबदबा आहे हे रिया सेनने चोखीचे सिद्ध केले आहे.
advertisement
4/11
रिया सेनची आई आणि आजी दोघीही प्रख्यात अभिनेत्री होत्या. रिया ही मूळची त्रिपुराची असून ती भारत देव वर्मा राजघराण्याशी संबंधित आहे. तिची आई मुनमुन सेन या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. तर तिची आजी सुचित्रा सेन याही त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.
advertisement
5/11
रिया सेनची बहीण रायमा सेन बंगाली अभिनेत्री आहे. पण, रिया सेनप्रमाणे तिलाही फिल्मी दुनियेत यश मिळवता आले नाही.
advertisement
6/11
१९८१ मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या रियाने 'ताजमहाल' चित्रपटातून नायिका म्हणून फिल्मी दुनियेत प्रवेश केला. यानंतर तिने प्रशांतसोबत 'गुड लक' चित्रपटात काम केले. 'स्टाईल' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
advertisement
7/11
रिया सेनचे बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले नाहीत. २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अपना सपना मनी मनी' या चित्रपटानंतर तिचे १२ चित्रपट सलग फ्लॉप ठरले. यातून सावरण्यासाठी रिया सेनला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. फाइल फोटो
advertisement
8/11
या अपयशाचा तिच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला, ज्यातून ती आजतागायत सावरू शकली नाही. २०१६ मध्ये रिलीज झालेल्या 'डार्क चॉकलेट' या चित्रपटाने तिने पुन्हा लक्ष वेधले. याशिवाय रिया सेन वेब सीरिजमध्येही काम करत आहे.
advertisement
9/11
चित्रपटांव्यतिरिक्त तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक वाद आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागला आहे. बिपाशा बसूच्या आधी जॉन अब्राहम रिया सेनला डेट करत होता आणि दोघांनाही लग्न करायचे होते असे म्हटले जाते.
advertisement
10/11
याशिवाय रियाचे नाव लेखक सलमान रश्दीसोबतही जोडले गेले होते, पण रियाने या अफवा फेटाळून लावल्या. तिचं नाव क्रिकेटपटू युवराज सिंग आणि श्रीशांतसोबतही जोडलं गेलं आणि अनेक वादांमध्ये ती अडकली.
advertisement
11/11
रियाने तिचा प्रियकर शिवम तिवारीसोबत २०१७ मध्ये एका खाजगी बंगाली समारंभात लग्न केले. सध्या ती 'डेथ टेल' या चित्रपटात काम करत आहे. फाइल फोटो
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who : 18व्या वर्षी डेब्यू, ॲक्टर्सच नाही तर 2 क्रिकेटरसोबत जोडलं नाव, राजघराण्यातील अभिनेत्री कुठे गायब झाली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल