'क्वीन' इज बॅक पण वेगळ्या अवतारात! कंगना रणौतच्या फिल्मचा सीक्वेल; नाव आणि स्टोरीही बदलली
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kangana Ranaut Queen : बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत क्वीन बनून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण ते एका नव्या अवतारात.
advertisement
1/7

अभिनेत्री कंगना रणौतची फिल्म क्वीन मार्च 2014 मध्ये रिलीज झाली होती तब्बल 12 वर्षांनी या फिल्मचा सीक्वेल येतो आहे. दरम्यान कोणत्याही फिल्मचा सीक्वेल म्हटलं की फिल्मचं मूळ नाव आणि 1, 2, 3 असा अपेक्षित असतो. पण कंगनाची क्वीन फिल्म ज्याच्या सीक्वेल मात्र काही वेगळाच असणार आहे.
advertisement
2/7
या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहलच करणार आहेत. पण कलाकारही बदलती. मुख्य कलाकार कंगना रणौत असेल, इतर नवीन चेहरे दिसतील. विशेषतः नाट्यक्षेत्रातील कलाकारांना महत्त्वाच्या भूमिकांसाठी निवडलं जात आहे, ज्यामुळे चित्रपटाला एक नवीन रूप मिळेल.
advertisement
3/7
रिपोर्टनुसार क्वीन फिल्मच्या सीक्वेलचं ना क्वीन 2 नाही तर क्वीन फॉरएव्हर असू शकतं. बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टनुसार निर्मात्यांना हे नाव फिल्मच्या संकल्पनेला अधिक समर्पक वाटलं. हे नाव फिल्मच्या स्टोरीला अधिक चांगल्या प्रकारे दर्शवत असल्याचं सांगितलं जातं आहे.
advertisement
4/7
फिल्मचं नावच नाही तर फिल्मची स्टोरीही बदलली आहे. रिपोर्टनुसार हा सीक्वेल पहिल्या फिल्मची स्टोरी पुढे नेणार नाही. स्टोरी वेगळी असली तरी आत्मशोध, स्वातंत्र्य अशा काही महत्त्वाच्या गोष्टी कामय ठेवल्या जातील. स्टोरीत असा ट्विस्ट असेल की ते तिला पुन्हा एकदा आत्मशोधाच्या प्रवासावर घेऊन जाईल.
advertisement
5/7
कंगनाचं पात्र तिच्या आधीच्या भूमिकेपेक्षा बरेच वेगळे असणार आहे. कंगना एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. पहिल्या चित्रपटात तिने एका निरागस, छोट्या शहरातील मुलीची भूमिका साकारली होती, तर यावेळी तिचं पात्र एका शहरी, आत्मविश्वासू आणि काहीशा वेगळ्या स्त्रीचे असेल.
advertisement
6/7
यावेळी कंगनाचा प्रवास परदेशी शहरांऐवजी भारतातील विविध महानगरांमध्ये घडेल, ज्यामुळे कथेला एक नवीन आयाम मिळेल.
advertisement
7/7
मुंबईतील एका स्टुडिओमध्ये शूटिंगला सुरुवात होईल, जिथं उत्तर भारतीय शहर आणि मुख्य पात्राच्या घराचे सेट उभारले जातील. त्यानंतर टीम देशभरातील इतर प्रमुख शहरांमध्ये जाईल आणि तीन महिन्यांत फिल्म पूर्ण करण्याची योजना आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'क्वीन' इज बॅक पण वेगळ्या अवतारात! कंगना रणौतच्या फिल्मचा सीक्वेल; नाव आणि स्टोरीही बदलली