TRENDING:

माय ती लेकरांची! 2 पिल्लांना पाठीवर घेऊन अस्वल आईने जंगलात 3 किमी केली प्रवास, PHOTOS पाहून लोक गहिवरले!

Last Updated:
आई म्हणजे ममता, त्याग आणि संरक्षण याचं मूर्तिमंत रूप. मग ती मानवाची असो किंवा जंगलातील प्राण्यांची...अशीच एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
advertisement
1/7
माय ती लेकरांची! 2 पिल्लांना पाठीवर घेऊन अस्वल आईने जंगलात 3 किमी केली प्रवास, PHOTOS पाहून लोक गहिवरले!
आई म्हणजे ममता, त्याग आणि संरक्षण याचं मूर्तिमंत रूप. मग ती मानवाची असो किंवा जंगलातील प्राण्यांची...अशीच एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दोन लेकरांना पाठीवर घेऊन एका अस्वलीने तब्बल २ ते ३ किमी प्रवास केला आहे. तिचा प्रवास कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहे.
advertisement
2/7
मेलघाटच्या हरिसाल–बोरी मार्गावर सेमाडोह आणि बोरी दरम्यान निसर्गाने एक हृदयस्पर्शी आणि दुर्मिळ क्षण अनुभवायला दिला.
advertisement
3/7
दाट जंगलातून मार्गक्रमण करताना एका मादी अस्वलीने आपल्या नाजूक शावकांना पाठीवर बसवून तब्बल २ ते ३ किलोमीटरचा प्रवास केल्याचे भावनिक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले.
advertisement
4/7
हा केवळ जंगलातील एक साधा प्रसंग नव्हता, तर आईच्या मायेचा, संरक्षणाचा आणि संघर्षाचा जिवंत प्रत्यय देणारा क्षण होता.
advertisement
5/7
शावकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आई अस्वलीन सावधपणे पावलं टाकत पुढे सरकत होती. तिच्या प्रत्येक हालचालीत काळजी, ममता आणि आईपणाची जाणीव स्पष्ट दिसत होती.
advertisement
6/7
निसर्गातील हा अनमोल क्षण पाहणाऱ्यांच्या मनाला स्पर्शून गेला. जंगलातील कठीण परिस्थितीतही आई आपल्या लेकरांसाठी किती सजग आणि समर्पित असते,याची जाणीव या दृश्यातून पुन्हा एकदा झाली.
advertisement
7/7
हे दुर्मिळ आणि भावनिक दृश्य रोहित पाल यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले असून, सध्या हा व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या मनात आईच्या मायेबद्दल आदर आणि प्रेम निर्माण करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
माय ती लेकरांची! 2 पिल्लांना पाठीवर घेऊन अस्वल आईने जंगलात 3 किमी केली प्रवास, PHOTOS पाहून लोक गहिवरले!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल