व्हिडीओमध्ये प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आपल्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या बायको आणि नवजात मुलांना पाहण्यासाठी निघाला आहे. तो व्हिलचेअर असून त्याला नीट उभंही राहता येत नाहीये. दुसरा जन्म माझ्या मुलासाठी असं म्हणत त्याने व्हिडीओ शेअर केला आहे. मुलाला हातात घेताच तो ओक्शाबोक्शी रडला.
advertisement
आपण बोलत आहोत प्रसिद्ध यूट्यूबर अनुराग डोवालबद्दल. अनुराग नुकताच बाबा झाला. त्याची पत्नी रितिका चौहानने 27 मार्च 2026 रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर एका मुलाला जन्म दिला. रितिकाने सोशल मीडियावर बाळाच्या चिमुकल्या पायांचा फोटो शेअर केला होता. मुलांच्या जन्माची माहिती रितिकाने अनुरागला दिली नव्हती अशा चर्चा आहेत. रितिकाने तिच्या पोस्टमध्ये अनुरागला टॅग केले नाही, तसेच अनुरागने वडील झाल्याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. दोघांमध्ये काही तरी बिनसलं असल्याच्या चर्चा यामुळे सुरू झाल्या आहेत.
अनुराग त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. त्याने नुकतेच स्वतःच्या आई-वडिलांवर आणि भावावर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले. दरम्यान दिल्ली-मेरठ महामार्गावर अनुरागचा अपघात झाला. त्यानंतर हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं झालं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपघातानंतर अनुराग बरा होण्यासाठी मित्राच्या फार्महाऊसवर गेला होता. रितिका त्याच्यासोबत राहत नव्हती.
रितिका चौहानने आता मौन सोडले असून आपल्या सासरच्या मंडळींचा बचाव केला आहे. इंस्टाग्रामवर एका भावनिक पोस्टमध्ये तिने अनुरागने कुटुंबावर केलेले आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. रितिका म्हणाली, ती इन्फ्लुएन्सर नाही याचा अर्थ असा नाही की तिच्याकडे सांगण्यासारखी कहाणी किंवा आवाज नाही. तिने स्पष्टपणे सांगितले आहे की, आपल्या मुलाच्या निरागसतेसाठी आणि कुटुंबाच्या शांततेसाठी ती कोणतीही नकारात्मकता सहन करणार नाही. रितिका चौहानने लवकरच संपूर्ण सत्य उघड करण्याचे संकेतही दिले आहेत.
