TRENDING:

IPL 2026 : चॅम्पियन RCB ला चॅलेंज, पहिल्या सामन्यातच 300 होणार... SRH ने उतरवली खतरनाक प्लेइंग इलेव्हन!

Last Updated:
आयपीएल 2026 च्या मोसमाला सुरूवात झाली आहे. यंदाच्या आयपीएलचा पहिलाच सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होत आहे.
advertisement
1/7
चॅम्पियन RCB ला चॅलेंज, पहिल्या सामन्यातच 300 होणार... SRH ने उतरवली खतरनाक प्लेइंग इलेव्हन!
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलच्या 19व्या मोसमाची पहिली लढत होत आहे. चिन्नास्वामीची खेळपट्टी कायमच मोठ्या स्कोअरसाठी ओळखली जाते. आरसीबी आणि हैदराबादच्या टीममध्ये एका पेक्षा एक विस्फोटक बॅटर आहेत, त्यामुळे या सामन्यात धावांचा पाऊस पडणार आहे.
advertisement
2/7
गतविजेत्या आरसीबीला मात्र पहिल्याच सामन्याआधी एका मागोमाग एक धक्के लागले आहेत. आरसीबीचं प्रमुख अस्त्र असलेला फास्ट बॉलर जॉश हेजलवूड अजून आलेला नाही, तर नुवान तुषाराही फिट नाही. यश दयाळनेही मोसमातून माघार घेतली आहे, त्यामुळे आरसीबीकडे त्यांचे 3 फास्ट बॉलरच नाहीत.
advertisement
3/7
दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादही पॅट कमिन्सशिवाय मैदानात उतरत आहे, त्यामुळे हैदराबादने टीमचं नेतृत्व इशान किशनकडे दिलं आहे. हैदराबादकडे अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, लियाम लिव्हिंगस्टोन, नितीश कुमार रेड्डी अशी तगडी बॅटिंग लाईनअप आहे. आरसीबीप्रमाणेच हैदराबादची बॉलिंगही कमकुवत आहे.
advertisement
4/7
या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. 'आम्ही आधी बॉलिंग करू. टीममध्ये अनेक चांगले खेळाडू आहेत, प्रत्येकजण फिट आहे आणि या सामन्यासाठी उत्सुक आहे. जर्सीवर दुसरा स्टार (विजेतेपदाचे चिन्ह) लावण्यासाठी आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू', असं रजत पाटीदार म्हणाला आहे.
advertisement
5/7
'ही खेळपट्टी अगदी नवी वाटतेय, तुम्ही आधी बॅटिंग करा किंवा बॉलिंग, त्याने फारसा फरक पडणार नाही. आपल्याला काहीही नवीन करण्याची गरज नाही. फक्त आपल्या योजनांची योग्य अंमलबजावणी करायची आहे. प्रत्येक खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे', अशी प्रतिक्रिया इशान किशनने दिली आहे.
advertisement
6/7
आरसीबीची प्लेइंग इलेव्हन : विराट कोहली, फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जेकब डफी, सुयश शर्मा
advertisement
7/7
हैदराबादची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (विकेटकीपर-कर्णधार), हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, एशान मलिंगा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : चॅम्पियन RCB ला चॅलेंज, पहिल्या सामन्यातच 300 होणार... SRH ने उतरवली खतरनाक प्लेइंग इलेव्हन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल