अशोक खरात प्रकरणात दीपक केसरकर यांचे काही फोटो व्हायरल झाले आहे. एवढंच नाहीतर दीपक केसरकर यांनीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे घेऊन गेले होते, असा आरोप विरोधकांनी केला होता. या मुद्यावर पहिल्यांदाच दीपक केसरकर यांनी आपली भूमिका मांडली.
"महाराष्ट्रात साध्य खरात बाबत बातम्या येत आहेत, त्याने केलेलं कृत्य घृणास्पद चुकीचे त्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हावी. मी भेट दिली त्यावर खुलासा देणे गरजेचं आहे. मी शिव भक्त, मंदिराला भेट देताना त्याची आणि माझी भेट झाली, त्यावेळी एक छायाचित्र घेण्यात आले. शिंदे साहेब पूजा करत होते, त्यावेळचे एक फोटो आहे, एक ऑफिसचा फोटो होता, तिसरा सिन्नरच्या कार्यक्रमातला, तिथे रूपाली चाकणकर पण होते. ओळख असणे म्हणजे त्यांच्या सोबत असणे असे होत नाही. मी कोणत्याही पोलीस ठाण्यात त्यांना वाचविण्यासाठी फोन केला नाही' अशी भूमिका दीपक केसरकरांनी मांडली.
advertisement
"उद्धव ठाकरे गटाचे नेते माझं नाव घेण्यात आघाडीवर आहेत, बंड झालं त्यावेळी मी शिंदेंची बाजू समजावून सांगितली. त्यांना महाराष्ट्र पेटवायचा होता, मात्र त्यांना ते साध्य करता आले नाही, त्याचा हा राग काढत आहे. झालेली घटना घृणास्पद आहे, जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. उबाठाच्या वतीने माझ्या मतदारसंघात मोर्चे काढण्यात आले, त्यांच्या नेत्याने त्या मंदिराला लाइट आणून दिली , त्यांनी केले ते चांगले? एकदा का खरातवर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर जे माझ्यावर आरोप करत आहेत, माझी बदनामी करत आहेत यांच्यावर काय कारवाई करता येईल ते पाहणार आहे, असा इशाराही केसरकरांनी दिला.
'मी कोणत्याही आमदारांना घेऊन गेलो नाही'
"एखाद्या मंदिरात प्रचिती येते, एकाकडून दुसऱ्याकडे ही गोष्ट जाते, त्यामुळे हे लोक फोफोवतात. वेगवेगळे विधी केले जातात, त्यात मी कधीही भाग घेतला नाही. मी फक्त शिंदे साहेब यांच्यासोबत गेलो होतो, कोणत्याही आमदाराला मी घेऊन गेलो नाही.
एकनाथ शिंदे यांनी त्या मंदिराबाबत ऐकले होते, १० किलोमीटरवर ते मंदिर होते म्हणून ते सपत्नीक तिथे गेले. माझा दिवस असा साईबाबांच्या काकड आरतीने सुरू होतो. पहाटे सहा वाजता माझी काकड आरती सुरू होते. अशा कुठल्याही प्रकारच्या विधीवर मी विश्वास ठेवत नाही. राजकीय षडयंत्र संजय राऊत आणि त्यांच्या कंपनीने केलेल्या आहे. माझ्या घरामध्ये आजपर्यंत कधीही पूजा झालेली नाही फक्त स्वामी समर्थ यांच्या पादुका येत असतात. याव्यतिरिक्त कुठली पूजा माझ्या घरी होत नाही' असंही केसरकर म्हणाले.
महिलांवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा महिला आयोगाची फार मोठी जबाबदारी असते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फक्त ते दोन वेळा भेटले आहेत. मला यात ठाकरे यांच्या शिवसेनेकडून टार्गेट केले जात आहे. पोलिसांना देखील या संदर्भात काही कल्पना नव्हती. यांच्यावर अन्याय झालेला आहे ती लोक पुढे येत नाही. बदनामी होईल या भीतीपोटी पुढे येत नाहीत. राज्यसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असंतोष आहे. ठाकरे गटामध्ये अनेक लोक नाराज आहे. त्यामुळे लवकरच काही गोष्टी होतील. राज्यसभा निवडणुकीनंतर अनेक नेते अस्वस्थ आहेत ते देखील आमच्याकडे येऊ शकतात, असंही केसरकर म्हणाले.
तसंच, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे, याबद्दल विचारले असता, नरहरी झिरवळ प्रकरणी माहीत नाही. पण योग्य निर्णय सुनेत्रा पवार घेतील, असं म्हणत केसरकरांनी पुढे बोलण्याचं टाळलं.
