Guess Who: जे कोणालाच जमलं नाही, ते 66 वर्षीय अभिनेत्याने करून दाखवलं! दिल्या सलग चार 1000 कोटींच्या फिल्म
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Actor who gave most 1000cr films: एक अभिनेता असा आहे, ज्याने मनोरंजन विश्वात तब्बल ५५ वर्षे पूर्ण करूनही त्याची क्रेझ काही केल्या कमी होत नाही आहे. या व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय बॉलिवूडचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.
advertisement
1/9

भारतीय सिनेसृष्टीत अनेक सुपरस्टार येऊन गेले, ज्यांनी इंडस्ट्रीला अनेक उत्तमोत्तम सिनेमे दिले आहेत. मात्र, एका काळानंतर त्यांची जादू कमी होते. पण एक अभिनेता असा आहे, ज्याने मनोरंजन विश्वात तब्बल ५५ वर्षे पूर्ण करूनही त्याची क्रेझ काही केल्या कमी होत नाही आहे.
advertisement
2/9
या व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय बॉलिवूडचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. हा अभिनेता आहे आपल्या सर्वांचा लाडका संजू बाबा. त्याचा जबरदस्त लूक आणि रांगडा स्वॅग आजही अनेकांना घायाळ करतो. वयाची ६६ वर्षो ओलांडली असली तरीही त्याचा जलवा आजही कायम आहे.
advertisement
3/9
दरम्यान, संजय दत्त हा भारतीय सिनेसृष्टीतील असा एकमेव अभिनेता आहे, ज्याने १००० कोटींचे सर्वाधिक सिनेमे दिले आहेत. तो मुख्य भूमिकेत नसला, तरीही ज्या ज्या चित्रपटात तो सपोर्टिंग किंवा व्हिलनच्या भूमिकेत येतो, तिथे तो मुख्य हिरोलाही भारी पडतो. त्याची थिएटरमध्ये एन्ट्री झाली की थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट होणार हे नक्की.
advertisement
4/9
संजय दत्तने हिरो, सहाय्यक भूमिका आणि मुख्य व्हिलन अशा सर्व पात्रांमध्ये प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. त्याच्या कोणत्या चित्रपटांनी १००० कोटींच्या क्लबमध्ये आपली जागा बनवली आहे, जाणून घेऊया.
advertisement
5/9
साऊथ फिल्म KGF: Chapter 2 मध्ये संजय दत्तने खूंखार 'अधिरा' ची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच दहशत निर्माण केली होती. या चित्रपटाने जगभरात तब्बल १२०० कोटींहून अधिक कमाई केली.
advertisement
6/9
शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर फिल्म जवानमध्ये संजय दत्तने कॅमिओ केला होता. त्याने एक पॉवरफुल पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली होती. अवघ्या काही मिनिटांच्या स्क्रीन टाईममध्ये त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि या चित्रपटाने ११६० कोटींचा टप्पा ओलांडला.
advertisement
7/9
धुरंधर मध्ये संजय दत्तची महत्त्वाची भूमिका आहे. या फिल्ममध्ये तो 'एसपी अस्लम' या गुन्हेगारांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या एका दबंग पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. धुरंधरने जगभरात १३०० कोटींहून अधिक कमाई केली होती.
advertisement
8/9
आता धुरंधर २ ने अवघ्या पाच दिवसात ८०० कोटींहून अधिक कमाई करत १००० कोटींकडे कूच केली आहे. हे पाहता संजू बाबाच्या नावावर आता सलग चौथा १००० कोटींचा चित्रपट जमा होणार हे स्पष्ट आहे.
advertisement
9/9
जेव्हा संजू बाबा पडद्यावर येतो, तेव्हा तो केवळ अभिनय करत नाही, तर त्या पात्रात आपला जीव ओततो. म्हणूनच त्याला इंडस्ट्रीचा 'सर्वात जास्त १००० कोटींचे चित्रपट देणारा हिरो' म्हटलं जातंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who: जे कोणालाच जमलं नाही, ते 66 वर्षीय अभिनेत्याने करून दाखवलं! दिल्या सलग चार 1000 कोटींच्या फिल्म