'स्वत: 150 रुपयांची साडी नेसते', हिंदुस्तानी भाऊ जया बच्चनवर भडकला, पापराझींवरील त्या कमेंटवर संताप
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Hindustani Bhau on Jaya Bachchan : जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी पापराझींवर जोरदार टीका केली होती. यामुळे आता हिंदुस्तानी भाऊ जया बच्चन यांच्यावर भडकलेला पाहायला मिळत आहे.
advertisement
1/7

हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकतो. यावेळी त्याने राज्यसभा खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.
advertisement
2/7
जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी पापराझींवर जोरदार टीका केली होती. आता हिंदुस्तानी भाऊ एका कार्यक्रमात जया बच्चन यांच्या वक्तव्यावर म्हणाला,"त्यांनी कपड्यांवर टीका केली आहे ना? काय नाव आहे अमिताभ बच्चन यांच्या पत्नीचे? जया बच्चन स्वत: 150 रुपयांची साडी नेसतात. कुराड बाजारातून त्या या साड्यांची खरेदी करतात आणि लोकांना गरीब म्हणतात. कसे घाणेरडे कपडे घालून येतात? असंही विचारतात.
advertisement
3/7
अरे, जिथे तुम्हाला सन्मान मिळत नाही, अशा लोकांच्या मागे का जाता? तुम्ही त्यांना दाखवणं बंद केलं, की त्यांना त्यांची जागा काय आहे हे कळेल. समजलं? तुमच्यामुळेच हे लोक दिसतात. नाहीतर त्यांना कुत्राही ओळखणार नाही, असं हिंदुस्तानी भाऊ पापराझींना म्हणाला.
advertisement
4/7
हिंदुस्तानी भाऊ पुढे म्हणाले,"जिथे तुम्हाला सन्मान मिळत नाही तिथे का जायचं? मी सगळ्यांना हात जोडून सांगतोय आपण जे काही बनलो आहोत ना, ते तुमच्यामुळेच बनलो आहोत. मी जर तुमचा सन्मान केला नाही, तर तुम्हाला विचार करणे खूप गरजेचे आहे. का जाता तिथे?
advertisement
5/7
हिंदुस्तानी भाऊ पापराझींना म्हणाला,"तुमच्यावर जो वर मालक बसलाय ना, त्याला सांगा तू एकदा जा. जिथे आमचा अपमान होतो, तिथे तू जा. तुला जेव्हा अपमान सहन करावा लागेल, तेव्हा तुला कळेल. म्हणून अशा लोकांच्या मागे जाऊ नका भाऊ. जिथे तुमचा सन्मान होत नाही. तुम्हीच त्यांना घडवले आहे".
advertisement
6/7
जया बच्चन यांनी बरखा दत्त यांच्या ‘मोजो स्टोरी’च्या ‘वी द वुमन’ शोमध्ये पापाराझींविषयी म्हटलं होतं,“मीडियासोबत माझं नातं खूप चांगलं आहे, पण पापाराझींशी माझं नातं अजिबात चांगलं नाही. हे लोक कोण आहेत? घाणेरडी टाइट पँट घालून, हातात मोबाईल घेऊन बसलेले असतात. त्यांना वाटतं की फक्त मोबाईल असल्यामुळे ते तुमचा फोटो काढू शकतात आणि काहीही बोलू शकतात.
advertisement
7/7
जया बच्चन पुढे म्हणाल्या होत्या,"मला पापराझी अजिबात आवडत नाही. पापराझींना वाटतं की ते उंदरासारखं कोणाच्याही घरी मोबाईल कॅमेऱ्यासह घुसू शकतात".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'स्वत: 150 रुपयांची साडी नेसते', हिंदुस्तानी भाऊ जया बच्चनवर भडकला, पापराझींवरील त्या कमेंटवर संताप