TRENDING:

एका चुकीमुळं बरबाद झालं कपूर घराण्यातील या अभिनेत्याचं करिअर; आता करतो साईड रोल

Last Updated:
बॉलिवूडमध्ये अनेक भावंडानी सोबत एंट्री घेतली आणि नाव कमावलं. पण त्यातला एक हिट झाला आणि दुसऱ्याला अपयश भोगावं लागलं. आज आम्ही तुम्हाला अशा एका बॉलिवूड अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याचे दोन्ही भाऊ आजही इंडस्ट्रीत खूप नाव कमावतायत, पण त्याला यश मिळालं नाही. हा अभिनेता आहे संजय कपूर. संजयने करिअरच्या सुरुवातीच्या काळात बॉक्स ऑफिसवर अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले, परंतु 2003 मध्ये त्याच्याकडून एक मोठी चूक झाली ज्यामुळे त्याने एक ब्लॉकबस्टर चित्रपट गमावला आणि त्यानंतर त्याच्या करिअरला गळती लागली.
advertisement
1/7
एका चुकीमुळं बरबाद झालं कपूर घराण्यातील या अभिनेत्याचं करिअर; आता करतो साईड रोल
संजय कपूरने 1995 मध्ये आलेल्या 'प्रेम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. संजयचा पहिला चित्रपट 'प्रेम' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला असला तरी त्याच वर्षी प्रदर्शित झालेला त्याचा दुसरा चित्रपट 'राजा' ब्लॉकबस्टर ठरला.
advertisement
2/7
'राजा' नंतर संजय प्रेक्षकांमध्ये चांगलाच प्रसिद्ध झाला. त्याचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सातत्याने यशस्वी ठरत होते. त्याच वेळी, 2003 मध्ये, संजय कपूरने अशी एक चूक केली, ज्यानंतर त्याच्या करिअरमध्ये घसरण सुरू झाली आणि लवकरच तो पडद्यापासून दूर जाऊ लागला.
advertisement
3/7
2003 मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेला एक चित्रपट म्हणजे सलमान खानचा 'तेरे नाम'. या चित्रपटाने सलमान खानला रातोरात सुपरस्टार बनवले.
advertisement
4/7
'तेरे नाम' हा चित्रपट आधी दिग्दर्शक अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला होता, पण सलमान खानसोबत अडचणीत आल्यानंतर त्याला चित्रपटातून बाहेर फेकण्यात आले आणि त्यानंतर सतीश कौशिक यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.
advertisement
5/7
पण 'तेरे नाम' या चित्रपटासाठी सलमान खान नाही तर आधी संजय कपूरचा विचार झाला होता. जेव्हा अनुराग कश्यप हा चित्रपट दिग्दर्शित करत होता आणि त्याने या चित्रपटासाठी सर्वप्रथम संजय कपूरला संपर्क केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय कपूरने काही कारणास्तव हा चित्रपट करण्यास नकार दिला होता, त्यानंतर सलमान खानला या चित्रपटाची ऑफर मिळाली.
advertisement
6/7
या चित्रपटानंतर सलमानची कारकीर्द एका नवीन उंचीवर पोहोचली, त्यानंतर सलमान खानचं नशीब चमकलं आणि आजपर्यंत तो बॉक्स ऑफिसवर हिट मशीन बनला आहे. दुसरीकडे, हा चित्रपट नाकारल्यानंतर संजय कपूरच्या करिअरला उतरती कळा लागली.
advertisement
7/7
2003 पासून, संजयचे जवळपास सर्वच चित्रपट फ्लॉप आणि डिझास्टर ठरले आणि आजपर्यंत त्याने बॉक्स ऑफिसवर एकही हिट चित्रपट दिलेला नाही. त्यानंतर त्याने स्वतःला चित्रपटांपासून दूर केलं आणि आज तो अधूनमधून चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एका चुकीमुळं बरबाद झालं कपूर घराण्यातील या अभिनेत्याचं करिअर; आता करतो साईड रोल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल