माजी मुख्यमंत्र्यांची होणारी नातसून, 29 व्या वर्षी कोट्यवधींची मालकीण; लॅविश आयुष्य जगतेय अभिनेत्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
लॅविश आयुष्य जगतेय ही स्टार किड. 29 व्या वर्षी ती कोट्यवधींची मालकीण आहे. काही वर्षात ती माजी मुख्यमंत्र्यांची सून होणार आहे.
advertisement
1/11

वयाच्या 29 व्या वर्षी ही स्टार किड लॅविश आयुष्य जगतेय. तिच्या बोल्डनेसने तिने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. तिचा पहिलाच सिनेमा हिट झाला. मात्र त्यानंतरचा हिट पाहण्यासाठी तिला 5-6 वर्ष वाट पाहावी लागली.
advertisement
2/11
ही स्टारकिड वयाच्या 29 व्या वर्षी कोट्यवधींची मालकीण आहे. तिची आई सुपरस्टार होती. वडिलही कलाकार, बहिणही अभिनय क्षेत्रात आहेत.
advertisement
3/11
अभिनेत्री लवकरच माजी मुख्यमंत्र्यांची सून होणार आहे. तिच्या कामापेक्षा अनेकदा ती तिच्या बॉयफ्रेंडमुळेही चर्चेत असते. तिचा बॉयफ्रेंड हा बिझनेस क्षेत्रात नाव कमावतोय.
advertisement
4/11
आपण बोलत आहोत श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर हिच्याबद्दल. जान्हवी आज तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. जान्हवीने 2018 मध्ये 'धडक' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आज वयाच्या 29 व्या वर्षी कोट्यवधींच्या संपत्तीची ती मालकीण आहे. जान्हवी कपूरचं नेटवर्थ किती आहे माहितीये?
advertisement
5/11
जान्हवी कपूर बॉलीवूडमध्ये सात वर्षांपासून आहे या काळात तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्येष्ठ निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत श्रीदेवी यांची मुलगी, तिने तिच्या कठोर परिश्रमाने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. तिच्या यशस्वी कारकिर्दीत हिंदी प्रेक्षकांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर, तिने दक्षिणेकडेही पाऊल ठेवले आहे.
advertisement
6/11
'धडक' चित्रपटातून उत्कृष्ट पदार्पणानंतर जान्हवी कपूरने 'गुंजन सक्सेना' चित्रपटात कारगिल गर्ल गुंजन सक्सेनाची भूमिका साकारली आणि तिने केवळ प्रेक्षकांवरच नव्हे तर समीक्षकांवरही कायमची छाप सोडली. तिच्या पुढच्या चित्रपट 'रूही' मधील अभिनेत्रीच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला.
advertisement
7/11
समीक्षकांनी जान्हवीच्या प्रतिभेवर भाष्य केले आहे, प्रत्येक चित्रपटासोबत तिची प्रतिभा सुधारत असल्याचे नमूद केले आहे. गेल्या वर्षी 'मिस्टर अँड मिसेस माही' मध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयाचे प्रदर्शन केल्यानंतर अभिनेत्रीने दक्षिण भारतीय चित्रपटात प्रवेश केला.
advertisement
8/11
2024 मध्ये जान्हवी कपूर ज्युनियर एनटीआर सोबत 'देवरा' मध्ये दिसली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपवादात्मक कामगिरी केली. 'देवरा' हा चित्रपट जान्हवीच्या कारकिर्दीतील धडक नंतरचा दुसरा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला. जो अभिनेत्रीचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
advertisement
9/11
चित्रपटांव्यतिरिक्त जान्हवी कपूर ब्रँड एंडोर्समेंट आणि जाहिरात चित्रपटांद्वारे देखील मोठी कमाई करते. प्रत्येक एंडोर्समेंटसाठी 75 - 80 लाख रुपये फी घेते. ती अनेक लोकप्रिय ब्रँडची चेहरा आहे. ही अभिनेत्री अल्डो, रेने कॉस्मेटिक्स, काजो, ड्रूल आणि न्याका सारख्या प्रमुख ब्रँडची अँम्बेसेडर आहे.
advertisement
10/11
जान्हवी कपूर मुंबईत दोन आलिशान अपार्टमेंटची मालकीण आहे. तिने मुंबईत 39 कोटी किमतीचे 3 बीएचके खरेदी केले. तिच्याकडे वांद्रे येथे 65 कोटी किमतीचे आणखी एक घर आहे. तिच्याकडे चेन्नईमध्ये एक घर आहे जे तिच्या आईकडून वारशाने मिळाले आहे.
advertisement
11/11
अनेक आलिशान गाड्या असलेली जान्हवी कपूर तिचे वडील बोनी कपूर आणि बहीण खुशी कपूर यांच्यासोबत एका आलिशान घरात राहते. लाईफस्टाईल एशियानुसार, जान्हवीची संपत्ती जवळपास 82 कोटींहून अधिक आहे. जान्हवी कपूर माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडियाबरोबर लग्न करणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
माजी मुख्यमंत्र्यांची होणारी नातसून, 29 व्या वर्षी कोट्यवधींची मालकीण; लॅविश आयुष्य जगतेय अभिनेत्री