'पँटमध्ये लघवी करावी लागेल' दिग्दर्शकाची अट ऐकून खूश झाली 29 वर्षीय अभिनेत्री, झटक्यात कळवला होकार
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या सिनेमांच्या शूटिंगच्या वेळी घडलेले हटके किस्से ऐकायला मिळाले, की कुतूहल वाढतं. अशीच एक गोष्ट आहे सध्या चर्चेत असलेल्या अभिनेत्री जानकी बोडीवाला हिची.
advertisement
1/7

प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या सिनेमांच्या शूटिंगच्या वेळी घडलेले हटके किस्से ऐकायला मिळाले, की कुतूहल वाढतं. अशीच एक गोष्ट आहे सध्या चर्चेत असलेल्या अभिनेत्री जानकी बोडीवाला हिची.
advertisement
2/7
२९ वर्षीय ही सुंदर अभिनेत्री अलीकडेच अजय देवगण आणि आर. माधवनसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत ‘शैतान’ या हिंदी सिनेमात झळकली. पण ती पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे ते तिच्या एका धाडसी कबुलीमुळे.
advertisement
3/7
जानकीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, ‘शैतान’ ही मूळतः गुजराती ‘वश’ या सिनेमाचा रिमेक आहे. आणि त्यातील एका सीनमध्ये तिला खरंच लघवी करायला सांगण्यात आलं होतं. हो, अगदी सेटवर, तेही कॅमेऱ्यासमोर!
advertisement
4/7
ती म्हणाली, “डायरेक्टर कृष्णदेव याग्निक यांनी मला विचारलं की तू हा सीन खरा करू शकतेस का? कारण त्यामुळे सीनला जबरदस्त परिणाम मिळेल. आणि मला ऐकून खूप आनंद झाला. एक अभिनेत्री म्हणून मला काहीतरी असं करायला मिळणार होतं, जे कोणालाही मिळालं नसेल.”
advertisement
5/7
पण... सीन प्रत्यक्षात तसाच शूट झाला का? यावर जानकीने स्पष्ट केलं की, सेटवरील व्यवहार्यता आणि अनेक रीटेक्सच्या अडचणींमुळे, तो सीन तसाच शूट करणं शक्य नव्हतं. त्यामुळे टीमने दुसरा मार्ग शोधला. पण जानकीच्या दृष्टीने तो सीन फारच खास होता, कारण अभिनयातल्या सीमा ओलांडण्याची संधी तिला मिळाली. तिनं म्हटलं, “हा सीनच होता ज्यासाठी मी ही फिल्म केली. आणि आजही तो माझ्या आवडत्या सीनपैकी एक आहे.”
advertisement
6/7
‘वश’ सिनेमाची कथा एका अत्यंत धक्कादायक पार्श्वभूमीवर आधारित आहे, एका घरात येणाऱ्या अंधश्रद्धेच्या छायेखालील शैतानी कथेवर. जानकीने यात एका तरुण मुलीची भूमिका केली आहे जिला एक दुष्ट व्यक्ती आपल्या वशमध्ये घेतो आणि तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं.
advertisement
7/7
जानकी बोडीवाला ही मूळची गुजराती अभिनेत्री असून तिने ‘छेल्लो दिवस’ (२०१५) या सिनेमातून डेब्यू केला होता. त्यानंतर ती अनेक प्रादेशिक सिनेमांत दिसली आहे. पण ‘शैतान’ आणि या चर्चेत असलेल्या सीनमुळे ती आता राष्ट्रीय स्तरावर झळकत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'पँटमध्ये लघवी करावी लागेल' दिग्दर्शकाची अट ऐकून खूश झाली 29 वर्षीय अभिनेत्री, झटक्यात कळवला होकार