Kitchen Tips : भाजी करपली पण फेकूनही द्यायची नाही, मग काय करायचं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
How To Fix Burnt Vegetable : करपलेली भाजी फेकून देण्याऐवजी परिस्थितीनुसार योग्य उपाय केला, तर ती भाजी नीट होते, त्याची चव बिघडत नाही, अन्नाची नासाडी टाळता येते.
advertisement
1/7

स्वयंपाक करताना कधीतरी असं होतं की भाजी करपते. गॅसची फ्लेम फास्ट राहते, दुसरीकडे लक्ष असतं किंवा भाजीत पाणी कमी असतं, कारण काही असतो पण भाजी करपली की मग तिला करपल्याची किंवा कडवड चव आणि वास येतो.
advertisement
2/7
आता ही अशी भाजी कशी खायची म्हणून काही जण तर सरळ कचऱ्यात फेकून देतात. पण इतकी भाजी कचऱ्यात कशी फेकायची, मेहनतही आहे, असा विचारही काही वेळा मनात असतो. पण खरं सांगायचं तर प्रत्येक करपलेली भाजी फेकून देण्याची गरज नसते. थोडं शहाणपण आणि योग्य उपाय केले तर भाजी वाचवता येते आणि अन्नाची नासाडीही टाळता येते.
advertisement
3/7
सर्वात आधी हे ओळखणं महत्त्वाचं आहे की भाजी किती करपली आहे. जर भाजी थोडीशीच करपली असेल, म्हणजे तळाला थोडी चिकटली असेल किंवा हलकी जळकी चव येत असेल, तर ती सहज सुधारता येते. अशा वेळी भाजी लगेचच त्या कढईतून दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावी. कारण करपलेल्या कढईत ठेवली तर जळलेली चव भाजीमध्ये अधिक मुरते.
advertisement
4/7
थोडीशी करपलेली भाजी सुधारण्यासाठी जळलेला भाग काढून टाकावा. त्यानंतर भाजीमध्ये थोडंसं कोमट किंवा गरम पाणी शिंपडावं. कडूपणा कमी करण्यासाठी चिमूटभर साखर किंवा छोटासा गुळाचा तुकडा घालता येतो. काही भाज्यांमध्ये शेवटी थोडा लिंबाचा रस किंवा आमसूल घातल्यास चव सुधारते आणि करपलेली जाणवत नाही.
advertisement
5/7
कधी कधी भाजीपेक्षा मसाला करपतो, पण भाजी आतून व्यवस्थित शिजलेली असते. अशा वेळी वेगळ्या कढईत थोडं तेल गरम करून जिरं, मोहरी किंवा कांद्याची हलकी फोडणी द्यावी आणि त्या फोडणीत करपलेली भाजी घालावी. थोडंसं गरम पाणी घालून मीठ योग्य प्रमाणात घातल्यास नवीन फोडणीमुळे जुनी करपलेली चव दबून जाते. वरून कोथिंबीर घातल्यावर भाजी अगदी ताजी लागते.
advertisement
6/7
जर कोरडी भाजी जास्त करपली असेल, तर ती तशीच खाण्याऐवजी दुसऱ्या पदार्थात वापरता येते. उदाहरणार्थ, करपलेली बटाट्याची किंवा कोबीची भाजी पोळीमध्ये भरून रोल करता येतो, पराठ्याच्या पिठात मिसळून भाजी पराठा बनवता येतो किंवा डाळीत मिसळून मिक्स भाजी करता येते. दुसऱ्या घटकांसोबत मिसळल्यामुळे करपलेली चव खूप कमी जाणवते.
advertisement
7/7
कधी भाजीला जळका वास येतो, पण चव फार वाईट नसते. अशा वेळी कच्च्या बटाट्याचा एक तुकडा भाजीमध्ये पाच-दहा मिनिटं ठेवा, तो जळका वास शोषून घेतो. काही जण गरम कोळशाचा छोटा तुकडा वाटीत ठेवून त्यावर तूप टाकतात आणि ती वाटी भाजीच्या भांड्यात ठेवून झाकण ठेवतात. यामुळे वास कमी होतो. (सर्व फोटो : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Kitchen Tips : भाजी करपली पण फेकूनही द्यायची नाही, मग काय करायचं?