Marathi Actress : हॉरर मालिकेत करणार काम, पण स्वत:चाच चेहरा आरशात पाहून घाबरली हिरोईन, ही आहे कोण!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Actress : नव्या हॉरर मालिकेत ही अभिनेत्री काम करणार आहे. पण स्वत:चाच चेहरा आरश्यात पाहून घाबरली होती. कोण आहे ही अभिनेत्री!
advertisement
1/9

स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या काजळमाया मालिकेच्या पहिल्या टिझरने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे. मालिकेत दिसणारी ती नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे.
advertisement
2/9
ही अभिनेत्री हॉरर मालिकेत काम करणार आहे. पण शूटींगच्या पहिल्याच दिवशी स्वत:चाच चेहरा आरशात पाहून घाबरली होती.
advertisement
3/9
काजळमायामधील चेटकीण समोर आली आहे. अभिनेत्री रुची जाईल ही मालिकेत चेटकीणीची भूमिका साकारत आहे. काजळमाया ही तिची पहिलीच मालिका आहे.
advertisement
4/9
भूमिकेविषयी सांगताना रुची म्हणाली, "माझी पहिलीवहिली मालिका आहे त्यामुळे मी अतिशय उत्सुक आहे. मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनेत्री व्हायचं मी पाहिलेलं स्वप्न या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होत आहे."
advertisement
5/9
"काजळमाया मालिकेत मी विलक्षण सुंदर अश्या चेटकीणीच्या रुपात दिसणार आहे. खूप आव्हानात्मक भूमिका आहे."
advertisement
6/9
रुची पुढे म्हणाली, "प्रोमो शूटच्या दिवशी जेव्हा मी स्वत:ला चेटकीणीच्या रुपात पाहिलं तेव्हा मी देखिल एका क्षणासाठी घाबरले. मालिकेचं कथानक जितकं गूढ आहे तितकच उत्कंठावर्धक आहे."
advertisement
7/9
"प्रत्येक एपिसोडच्या शेवटी पुढे काय होणार हे पहाण्याची उत्सुकता वाढेल. नव्या रुपात आणि नव्या माध्यमात मी पाऊल टाकलं आहे."
advertisement
8/9
पर्णिका असं रुचीच्या भुमिकेचं नाव आहे. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. स्वतःचं अस्तित्व आणि सगळ्यांना पायाशी आणण्याची महत्वाकांक्षा यापलिकडे कुठलाही विचार तिच्या मनात कधीच नसतो.
advertisement
9/9
काजळमाया मालिकेत अभिनेत्री रुचीसोबत अभिनेता अक्षय केळकर देखील प्रमुख भूमिकेत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Actress : हॉरर मालिकेत करणार काम, पण स्वत:चाच चेहरा आरशात पाहून घाबरली हिरोईन, ही आहे कोण!