TRENDING:

एका नावाचे 2 चित्रपट, वडिलांचा फ्लॉप, 22 वर्षांनी मुलाने रचला इतिहास; 58 CR बजेट 193 कोटींची कमाई

Last Updated:
2 Flims With Same Name : हा असा चित्रपट आहे ज्यामध्ये 'विजय दीनानाथ चौहान' ही व्यक्तिरेखा नायकाची सिग्नेचर भूमिका बनली. दोन प्रसिद्ध स्टार्सनी ही भूमिका साकारली. प्रेक्षकांनी एकाला नाकारले आणि दुसऱ्याला सुपरस्टार बनवले.
advertisement
1/10
एका नावाचे 2 चित्रपट, वडिलांचा फ्लॉप, 22 वर्षांनी मुलाने रचला इतिहास
बॉलिवूडमध्ये एकाच नावाचे अनेक चित्रपट बनले आहेत. काही हिट झाले तर काही सुपर फ्लॉप. बॉलिवूडच्या एका बाप लेकाच्या जोडीने एकाच नावाचे दोन चित्रपट बनवले. एक फ्लॉप झाला. 22 वर्षांनंतर मुलाने त्याच नावाचा चित्रपट बनवला आणि तो बॉक्स ऑफिसवरहिट झाला.
advertisement
2/10
एका नावाचे 2 चित्रपट, वडिलांचा फ्लॉप, 22 वर्षांनी मुलाने रचला इतिहास
बॉलिवूडच्या इतिहासात एकाच नावाने बनवलेल्या दोन चित्रपटांची तुलना नेहमीच चर्चेत राहिली आहे. 1990 आणि 2012 मध्ये एकाच नावाने दोन चित्रपट बनवण्यात आले. त्या चित्रपटाचं नाव होतं 'अग्निपथ'. करण जोहरचे वडील यश जोहर 1990 मध्ये तर करण जोहरने 2012 मध्ये या चित्रपट रिमेक सादर केला.
advertisement
3/10
हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा निर्मात्यांमध्ये यश जोहरची गणना होते ज्यांनी बॉलिवूडला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.  यश यांनी देव आनंद साहेबांच्या नवकेतन सिनेमा प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली अनेक चित्रपटांची निर्मिती हाती घेतली.
advertisement
4/10
नंतर या अनुभवामुळे त्यांनी धर्मा प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं. याअंतर्गत त्यांनी 'दोस्ताना', 'अग्निपथ', 'गुमराह', 'कुछ कुछ होता है' आणि 'कभी खुशी कभी गम' सारखे चित्रपट तयार केले.
advertisement
5/10
आजही यश जोहर यांना एक दूरदर्शी निर्माता आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा आधारस्तंभ म्हणून आठवले जाते. त्यांच्या चित्रपटांमध्ये भारतीय संस्कृतीची झलक दिसून येते.
advertisement
6/10
यश जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने 1990 मध्ये 'अग्निपथ'ची निर्मिती केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकुल एस. आनंद यांनी केले होते. चित्रपटाची कथा विजय दीनानाथ चौहान या तरुणाची होती जो आपल्या वडिलांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये प्रवेश करतो.
advertisement
7/10
अमिताभ बच्चन, नीलम कोठारी, डॅनी डेन्झोंगपा, अर्चना पूरण सिंग सारखी स्टारकास्ट असतानाही हा सिनेमा हवी तशी कमाई करू शकला नाही.  करण जोहरने त्यांच्या 'अॅन अनसुटेबल बॉय' या आत्मचरित्रात ही गोष्ट शेअर केली आहे.
advertisement
8/10
22 वर्षांनंतर 2012 मध्ये त्याच्या वडिलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि तो आदर परत मिळवण्यासाठी करण जोहरने अग्निपथचा रिमेक बनवला. हृतिक रोशन अभिनीत 'अग्निपथ' हा चित्रपट सुपरहिट ठरला.  दिग्दर्शक करण मल्होत्रा ​​होते. कथा मुळात तीच होती. विजय दीनानाथ चौहानचा बदला पण त्याला आधुनिक स्पर्श देण्यात आला.
advertisement
9/10
चित्रपटाचे बजेट 57 कोटी रुपये होते. भारतात चित्रपटाने 120 कोटींचा बिझनेस केला. चित्रपटाचं जगभरातील एकूण कलेक्शन 193 कोटी रुपये होतं.
advertisement
10/10
करणने त्याच्या एका मुलाखतीत म्हटले होते, "माझ्यासाठी हा चित्रपट बनवणे म्हणजे माझ्या वडिलांना न्याय देणे आहे. 1990  मध्ये फ्लॉप झालेल्या चित्रपटाला यशस्वी करून मला त्यांना श्रद्धांजली वाहायची होती."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एका नावाचे 2 चित्रपट, वडिलांचा फ्लॉप, 22 वर्षांनी मुलाने रचला इतिहास; 58 CR बजेट 193 कोटींची कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल