Pune Weather: पश्चिम महाराष्ट्रात हवापालट! आज मुसळधार पाऊस की उघडीप? हवामान खात्याचं महत्त्वाचं अपडेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण, घाटमाथ्यासह राज्यात सुरू असलेला पाऊस ओसरण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीची शक्यता आहे.
advertisement
1/7

कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण, घाटमाथ्यासह राज्यात सुरू असलेला पाऊस ओसरण्याची शक्यता आहे. आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीची शक्यता आहे.
advertisement
2/7

सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात 0.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस राहील. तसेच पुढील 24 तासांसाठी सातारा घाटमाथ्यासह संपूर्ण सातारा परिसरात हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
3/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात शून्य मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानाचा पारा 26 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला. पुढील 24 तासात पुणे घाटमाथ्यासह उर्वरित पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 27 अंशापर्यंत वाढेल.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 0.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 26.8 अंश सेल्सिअस वाढले आहे. पुढील 24 तासात कमाल तापमान 27 अंशावर राहील. तसेच पुढील 24 तासांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप कायम आहे. यामुळे तापमानाचा पारा बत्तीशीतिशीपार जाऊन मागील 24 तासात 32.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 32 अंशावर राहील. तसेच पुढील 24 तासात सोलापूर जिल्ह्यात ढगाळ आकाश कायम आहे.
advertisement
6/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 0 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानात घट होऊन 30.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात हलक्या पावसाची शक्यता आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 29 तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
7/7
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असली तरीही बऱ्याच ठिकाणी कमाल तापमान वाढत आहे. राज्यात ऊन-सावल्यांसह ढगाळ वातावरण कायम आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीचा अंदाज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Weather: पश्चिम महाराष्ट्रात हवापालट! आज मुसळधार पाऊस की उघडीप? हवामान खात्याचं महत्त्वाचं अपडेट