TRENDING:

Mango Rate: गुढीपाडव्याला ‘हापूस’ महागला; आंबा बाजारात तेजी, एका डझनाचे दर किती?

Last Updated:
Mango Rate: गुढीपाडव्याला मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे आंब्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
advertisement
1/5
Mango Rate: गुढीपाडव्याला ‘हापूस’ महागला; आंबा बाजारात तेजी, एका डझनाचे दर किती?
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारात मोठ्या प्रमाणत हापूस आंब्याची आवक होतं असते. मात्र, यावर्षीचं चित्र वेगळ पाहायला मिळतं आहे. हवामानाची अस्थिरता आणि रोगराई यामुळे आंब्याच्या उत्पन्नात जवळपास 60 ते 70 टक्के घट झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना हापूस आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी अक्षय तृतीयापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
advertisement
2/5
सध्या मार्केटमध्ये फक्त 150 ते 200 पेट्यांची आवक होते. जी मागील काही वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी आहे. गुरुवारी, 19 मार्चला गुढीपाडवा असल्याने आंब्याची मागणी वाढली असली तरी पुरवठा कमी आहे.
advertisement
3/5
मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे आंब्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्या बाजारात आंबा एका डझनला 1,500 ते 3,500 रुपयांपर्यंत विकला जात आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना आंब्याची चव चाखण्यासाठी अक्षय्य तृतीयेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
advertisement
4/5
कोकणात पावसाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे जमीन दीर्घकाळ ओलसर राहिली. त्याचबरोबर थ्रिप्स रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आंब्याच्या मोहोराची गळती मोठ्या प्रमाणात झाली. परिणामी, आंब्याच्या उत्पन्नात घट झाली.
advertisement
5/5
यावर्षी बदलत्या हवामानामुळे तसेच तुडतुड्या आणि थ्रिप्स रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. दरवर्षीच्या तुलनेत फक्त 30 ते 40 टक्के उत्पादन हाती लागले आहे. त्यामुळे आंब्याच्या दरात वाढ झाली आहे. पुढील काही दिवसांत आवक वाढेल, असा अंदाज आंबा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Mango Rate: गुढीपाडव्याला ‘हापूस’ महागला; आंबा बाजारात तेजी, एका डझनाचे दर किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल