केक हा असा प्रकार आहे, जो घरातल्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतो. मात्र हाच केक आपण जरा वेगळ्या ट्विस्टसोबत बनवला तर..? त्यासाठी ही रेसिपी आणि हा केक एकदा नक्की ट्राय करा. या पंचामृत केकची रेसिपी the.divine.kitchen या इंस्टाग्राम हँडलवर दिलेली आहे.
पंचामृत केकसाठी साहित्य..
- दही
- तूप
- मध
advertisement
- दूध
- साखर
- रवा
- बेकिंग सोडा
- बेकिंग पावडर
- सुकामेवा
- वेलचीपूड
असे बनवा पंचामृत कपकेक..
- सर्वात आधी एका बाऊलमध्ये दही, तूप, मध, दूध आणि साखर टाकून व्यवस्थित मिक्स करा.
- त्यानंतर यामध्ये रवा टाका आणि परत व्यवस्थित मिक्स करा.
- रवा मिक्स केल्यानंतर हे बॅटर 15 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवा. या वेळेत रवा व्यवस्थित फुगेल.
- त्यानंतर वेलची पूड, चिरलेला सुकामेवा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकून हलक्या हाताने मिक्स करा.
- त्यानंतर हे मिश्रण कपकेकच्या ट्रेमध्ये आपल्याला भरायचं आहे.
- कपकेकच्या ट्रेमध्ये तुम्ही बाजारात मिनार कागदाचे मोल्डवापरू शकता किंवा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बटरपेपरचे मोल्ड घरीच बनवू शकता.
- हे पेपर मोल्ड कपकेकच्या ट्रेमध्ये ठेवा आणि त्यामध्ये बनवलले मिश्रण टाका.
- आता हा ट्रे ओव्हनमध्ये ठेवा आणि 180 डिग्री सेल्सिअसवर 15 मिनिटांसाठी बेक करा.
अशाप्रकारे तुमचे खास टेस्टी पंचामृत कपकेक तयार होतील. हे केक खरंच खूप टेस्टी बनतात. मुलांना तर हे आवडतीलच पण घरातील मोठी मंडळीही हे केक आवडीने खातील. शिवाय यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे हे तसे हेल्दी बनतात. तर एकदा हे केक नक्की बनवून पाहा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
