TRENDING:

नाही, पुन्हा नाही! 'ही' फिल्म पाहून जबरदस्त घाबरलाय करण जोहर; म्हणाला, 'तुम्ही पाहणार असाल तर...'

Last Updated:
Karan Johar : 13 फेब्रुवारी 2026 रोजी रिलीज झालेली ही फिल्म हॉरर नाही, तरी ती पाहिल्यानंतर करण जोहर घाबरला आहे, त्याने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट केली आहे.
advertisement
1/7
पुन्हा नाही! 'ही' फिल्म पाहून घाबरलाय करण जोहर; म्हणाला, तुम्ही पाहाल असाल तर...
गेले काही दिवस धुरंधर, बॉर्डर 2, मर्दानी 3 या फिल्म्सची जोरात चर्चा सुरू होती. आता 13 फेब्रुवारीला काही नवीन फिल्म्स रिलीज झाल्या आहेत. त्यापैकीच एक अशी फिल्म जी पाहून फिल्ममेकर करण जोहर घाबरला आहे. ही फिल्म हॉरर नाही तर एक सर्व्हायव्हल थ्रीलर ड्रामा आहे.
advertisement
2/7
करण जोहरने नुकतीच एक फिल्म पाहिली आणि त्याचा रिव्ह्यू सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फिल्मबाबत त्याने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या फिल्मला त्याने भयानक म्हटलं आहे. फिल्म संपल्यानंतरही तो अर्धा तास तणावात होता. असं त्याने सांगितलं
advertisement
3/7
करण जोहर पोस्टमध्ये म्हणाला, "फिल्मचा दुसरा पार्ट इतका डेंजर आहे की शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवतो. कार्डिओची गरज नाही. तुम्ही तुमच्या सीटवरून उडी माराल. करणने मजेत म्हटलं की, ही फिल्म पाहिल्यानंतर त्याला आता स्विमिंग पूलचीही भीती वाटते आहे."
advertisement
4/7
त्याने पुढे लिहिलं की, "जर तुम्ही व्हॅलेंटाईन डेला तुमच्या जोडीदारासोबत चित्रपट पाहणार असाल तर आधीच तयारीत राहा. कारण तुम्हाला इतकी भीती वाटेल की तुम्ही त्यांचा हात घट्ट धरून ठेवाल, तुमच्या सीटवरून उडी माराल."
advertisement
5/7
पुढे त्याने लिहिलं, मी फिल्म संपल्यावर अर्धा तास स्ट्रेसमध्ये होतो. आता वाटतं की मुंबईतील ट्रॅफिकमध्येही अचानक मगर येईल आणि माझ्यावर हल्ला करेल. हे जरा जास्तच नाट्यमय होतं आहे, पण फिल्मने खरोखरच भावनिक केलं.
advertisement
6/7
आता ही फिल्म कोणती हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल ही फिल्म आहे. 'तू या मैं', यात अभिनेत्री शनाया कपूर आणि अभिनेता आदर्श गौरव यांची भूमिका आहे.
advertisement
7/7
करण जोहरने चित्रपटाचे दिग्दर्शक बिजॉय नाम्बियार, अभिनेत्री शनाया कपूर आणि अभिनेता आदर्श गौरवच्या अभिनयाचंही कौतुक केलं. शनायाने मिस व्हॅनिटी आणि मिस इन्सॅनिटीच्या भूमिका अत्यंत आत्मविश्वासाने साकारल्याचं तो म्हणाला. तर आदर्श गौरवला "तू अद्भुत आहेस, तुझ्या भीतीचा प्रत्येक इंच मी अनुभवला!!!", असं म्हटलं. त्याने निर्माते आनंद एल. राय आणि विनोद भानुशाली यांचंही अभिनंदन केले. हा चित्रपट नक्कीच पहावा असा असल्याचं सांगून प्रेक्षकांनी तो चुकवू नका असं आवाहन त्याने केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नाही, पुन्हा नाही! 'ही' फिल्म पाहून जबरदस्त घाबरलाय करण जोहर; म्हणाला, 'तुम्ही पाहणार असाल तर...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल