अख्ख्या महाराष्ट्राला हसवणारा लक्ष्या ढसाढसा रडला! पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर लक्ष्मीकांत बेर्डेंची झालेली वाईट अवस्था
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Laxmikant Berde First WIfe: सध्या लक्ष्मीकांत यांची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या पहिल्या पत्नी रुही बेर्डे यांच्याबद्दल बोलताना आपलं हृदय मोकळं केलं आहे.
advertisement
1/9

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीचा असा एक अभिनेता, ज्याने आपल्या टायमिंगने आणि विनोदाने प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. पण पडद्यावर हसणाऱ्या या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आयुष्यात एक असं अथांग दुःख होतं, जे त्यांनी फार काळ जगासमोर मांडलं नव्हतं.
advertisement
2/9
सध्या लक्ष्मीकांत यांची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या पहिल्या पत्नी रुही बेर्डे यांच्याबद्दल बोलताना आपलं हृदय मोकळं केलं आहे. "ती गेल्यानंतर माझं जहाज बुडाल्यासारखं झालं," हे त्यांचे शब्द आजही चाहत्यांच्या काळजाला भिडतात.
advertisement
3/9
लक्ष्मीकांत बेर्डे आणि रुही यांची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखीच होती. दोघांची पहिली भेट 'वेडी माणसं' या नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली. पुढे 'कशात काय लफड्यात पाय' आणि 'शांतेचं कार्ट चालू आहे' या अजरामर नाटकांच्या निमित्ताने हे दोघे एकत्र आले.
advertisement
4/9
रंगमंचावर काम करता करता कधी प्रेम जुळलं, हे कळलंच नाही. १९८३ मध्ये दोघांनी संसार थाटला. रुही यांचं खरं नाव 'पद्मा' होतं, पण सिनेसृष्टीत त्या रुही म्हणूनच ओळखल्या जाऊ लागल्या.
advertisement
5/9
मुलाखतीत लक्ष्मीकांत यांनी एक अत्यंत हृदयस्पर्शी आठवण सांगितली. ते म्हणाले, "१५ वर्षांपूर्वी जेव्हा मी काहीच नव्हतो, तेव्हा रुहीकडे मोठे पत्रकार मुलाखत घ्यायला यायचे. त्यावेळी ती स्वतः बाजूला व्हायची आणि सांगायची की, 'जरा ह्याची सुद्धा मुलाखत घ्या, हा मुलगा उद्याचा मोठा सुपरस्टार आहे.' माझ्यातले गुण जगाला दिसण्याआधीच तिला ठाऊक होते."
advertisement
6/9
लक्ष्मीकांत यांच्या संघर्षाच्या काळात रुही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. त्यांच्या आई-वडिलांच्या आजारपणात आणि घरगुती अडचणीत रुही यांनी कधीही लक्ष्मीकांत यांना त्रास जाणवू दिला नाही. "सतत स्वतः हसत राहिली आणि मलाही हसवत ठेवलं," असं म्हणताना लक्ष्मीकांत यांचे डोळे पाणावले होते.
advertisement
7/9
लक्ष्मीकांत आणि रुही यांचा १५ वर्षांचा सुखी संसार सुरू होता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. रुही यांना अचानक ब्रेन हॅमरेजचा त्रास सुरू झाला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
advertisement
8/9
लक्ष्मीकांत यांच्यासाठी हा धक्का पचवणं अशक्य होतं. त्यांनी मुलाखतीत कबूल केलं की, "ती गेली तेव्हा मला माझं जहाज बुडाल्यासारखं वाटलं. मी पूर्णपणे हललो होतो. पण तिच्या आत्म्यानेच मला सांगितलं की, 'पुन्हा कामाला लाग, जोमाने काम कर.' ती मध्येच अशी उठून जायला नको होती, हा प्रवास तिला माझ्यासोबत पूर्ण करायचा होता."
advertisement
9/9
अभिनयाचे अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या नटाने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख पचवून जगाला शेवटपर्यंत हसवलं. रुही यांची ती साथ आणि लक्ष्मीकांत यांचं ते प्रेम आजही मराठी मनांमध्ये जिवंत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अख्ख्या महाराष्ट्राला हसवणारा लक्ष्या ढसाढसा रडला! पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर लक्ष्मीकांत बेर्डेंची झालेली वाईट अवस्था