शेणाचा गोळा तोंडाऐवजी छातीवर बसला अन्.., मधुराणीनं सांगितला 'मी सावित्रीबाई...' च्या प्रोमो शूटचा थरारक अनुभव
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मधुराणी प्रभुलकर 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका 5 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या प्रोमो शूटवेळी घडलेली घटना मधुराणीनं सांगितली.
advertisement
1/7

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली. जवळपास 5 वर्ष या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मालिकेत मधुराणीनं साकारलेली अरुंधती प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.
advertisement
2/7
आई कुठे काय करते मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर मधुराणी आता 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 5 जानेवारीपासून ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांची उत्तम प्रतिसाद मिळाला. ज्या प्रोमोची इतकी चर्चा होतेय तो प्रोमो शूट करताना मधुराणीच्या जीवावर बेतलं असतं.
advertisement
3/7
मुंबई टाइम्सशी बोलताना प्रोमो शूटवेळी नेमकं काय घडलं हे मधुराणीनं सांगितलं, ती म्हणाली, "मालिकेचा प्रोमो शूटचा अनुभव शेअर करताना मधुराणी म्हणाली, खरंच सावित्रीबाईंना बघतोय असं वाटत होतं, ही प्रेक्षकांची प्रतिक्रिया सगळ्यात मोठी होती."
advertisement
4/7
"प्रोमोचं शूट करताना खोटा हा होईना शेणाचा गोळा अंगावर मारला आणि माझ्या छातीवर बसला. तेव्हा त्या स्त्रीनं काय सहन केलं असेल याची जाणीव झाली."
advertisement
5/7
"त्या प्रसंगात इतरांचे डायलॉग इतके बोचणारे आणि टोचणारे होते. त्यांच्या जागी मी किंवा आजच्या जगातील कोणीही असचं तर तिळून पळालं असचं. ते शूटींग करताना जाणीव झाली की, भूमिकेच्या माध्यमातून या दिव्यांतून आपल्यालाही जायचं आहे."
advertisement
6/7
'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका 5 जानेवारीपासून सायंकाळी 7.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार असून डॉ. अमोल कोल्हे महात्मा जोतीराव फुले यांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
advertisement
7/7
साधारणतः दीडशे वर्षांपूर्वी, महिलांना चूल आणि मूल या मर्यादांमध्ये अडकवून ठेवणाऱ्या समाजव्यवस्थेविरोधात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीबा फुले यांनी ठामपणे एल्गार पुकारला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, घरच्यांचा आणि समाजाचा दुहेरी रोष सहन करत त्यांनी शिक्षणाची दारं खुली केली. काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या या विचारवंतांचा जीवनप्रवास मालिकेच्या रुपात उलगडणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
शेणाचा गोळा तोंडाऐवजी छातीवर बसला अन्.., मधुराणीनं सांगितला 'मी सावित्रीबाई...' च्या प्रोमो शूटचा थरारक अनुभव