माधुरी दीक्षितचा बिग बींसोबत इंटीमेट सीन करण्यास नकार; ही फिल्म नाकारली
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Madhuri Dixit Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित एका चित्रपटात झळकणार होते. पण काही कारणाने त्यांना हा चित्रपट करताच आला नाही.
advertisement
1/7

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. पण माधुरी दीक्षितने मात्र बिग बींसोबत काम करणं नाकारलं होतं.
advertisement
2/7
टीनू आनंद 1989 मध्ये 'शनाख्त' नावाचा एक चित्रपट बनवणार होते. या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत झळकणार होते.
advertisement
3/7
टीनू आनंद यांनी अमिताभ बच्चन यांना संहिता ऐकवली आणि बिग बींनी लगेच त्यांना आपला होकार कळवला.
advertisement
4/7
टीनू आनंद यांनी पुढे माधुरी दीक्षितला स्क्रिप्ट ऐकवली. पण माधुरीने मात्र हा चित्रपट करण्यास स्पष्ट नकार दिला.
advertisement
5/7
टीनू आनंद यांच्या 'शनाख्त' या चित्रपटात एक सीन असा होता की माधुरीला फक्त ब्रा घालून अमिताभ बच्चन यांच्यासमोर यायचं होतं. हाच सीन या चित्रपटातील हायलाइट असणार होता. पण याच कारणाने माधुरीने या चित्रपटाला नकार दिला.
advertisement
6/7
माधुरीच्या नकारानंतर टीनू आनंद यांनी 'शनाख्त' या चित्रपटाची निर्मिती केलीच नाही.
advertisement
7/7
अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित यांनी पुढे 'बडे मियां छोटे मियां' या चित्रपटात स्क्रीन शेअर केली. दोघांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
माधुरी दीक्षितचा बिग बींसोबत इंटीमेट सीन करण्यास नकार; ही फिल्म नाकारली