Madhuri Dixit Mother in Law : डॉ. नेनेंना तर बघितलं, माधुरीची सासू पहिल्यांदा कॅमेरात कैद, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री माधुरी दीक्षितनं सहकुटुंब सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी पहिल्यांदा माधुरीच्या सासूबाईंना पाहण्यात आलं.
advertisement
1/10

अभिनेत्री माधुरी दीक्षितनं नुकतंच प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. माधुरी सहकुटुंब बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाली.
advertisement
2/10
माधुरी दीक्षित आणि पती डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला पंचक हा मराठी सिनेमा येत्या 5 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे.
advertisement
3/10
पंचक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या माधुरीनं सिनेमाच्या यशासाठी सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना केली.
advertisement
4/10
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेलेल्या माधुरीबरोबर तिचे पती आणि दोन्ही मुलं देखील होती.
advertisement
5/10
माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांना सर्वांनाही पाहिलं आहे. पण पहिल्यांदाच माधुरीची सासू कॅमेरासमोर आली आहे.
advertisement
6/10
माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्याबरोबर त्यांची मुलं अरीन नेने आणि रायन नेने यांनीही सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.
advertisement
7/10
माधुरीबरोबरच मुलगा अरीन आणि रायन यांनी साऱ्यांचं लक्ष वेधलं आणि यावेळी माधुरीच्या सासूला देखील सर्वांनी पहिल्यांदा पाहिलं.
advertisement
8/10
माधुरीची सासू अनू नेने यांनी मुलगा, सून आणि नातवांबरोबर सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. अत्यंत गोऱ्यापान, शॉर्ट हेअर आणि ड्रेस घालून अनू नेने यांना स्पॉट करण्यात आलं. माधुरीची सासू यावेळी चर्चेचा विषय ठरली.
advertisement
9/10
माधुरीच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये तिची आई अनेकदा कॅमेरासमोर आली आहे. काही महिन्यांआधीच माधुरीच्या आईचं निधन झालं.
advertisement
10/10
पण अनेक वर्षात माधुरीची सासू मात्र कधीच कॅमेरासमोर आली नव्हती. सिद्धिविनायकाच्या दर्शनाच्या निमित्तानं माधुरीला पहिल्यांदा सासूबाईंबरोबर पाहण्यात आलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Madhuri Dixit Mother in Law : डॉ. नेनेंना तर बघितलं, माधुरीची सासू पहिल्यांदा कॅमेरात कैद, PHOTO