TRENDING:

Marathi Actors Second Marriage : असे 8 मराठी कलाकार ज्यांनी डिवोर्सनंतर पुन्हा थाटला संसार, एकाचं तर तिसरं लग्न

Last Updated:
Marathi Celebs Second Marriage : बॉलिवूड कलाकारांचे अफेअर्स आणि डिवोर्स नेहमीच चर्चेत राहिले आहेत. मराठी इंडस्ट्रीतील लव्ह अफेअर्सही चांगलेच गाजले आहेत. असे 8 मराठी कलाकार ज्यांनी घटस्फोटानंतर पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
1/8
असे 8 मराठी कलाकार ज्यांनी डिवोर्सनंतर पुन्हा थाटला संसार, एकाचं तर तिसरं लग्न
अभिनेता स्वप्निल जोशीने 2005 साली अपर्णाबरोबर लग्न केलं होतं. दोघे 2009 साली वेगळे झाले. त्यानंतर स्वप्निलने लिना हिच्याशी दुसरं लग्न केलं. लिना ही डेंटिस्ट आहे. दोघांना दोन मुलं आहेत.
advertisement
2/8
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने अमेय निपाणकरबरोबर पहिलं लग्न केलं होतं. 2018 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अभिनेत्री बिग बॉस मराठीच्या घरात तिच्या घटस्फोटाचा खुलासा केला होता. त्यानंतर तिने तेजस देसाईबरोबर दुसरं लग्न केलं. दोघेही सध्या निर्मिती क्षेत्रात काम करत आहेत.
advertisement
3/8
बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे हिने आदित्य पावसकरबरोबर लग्न केलं. आदित्यला त्याच्या पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे. तर मेघाला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगी आहे. घटस्फोटानंतर आदित्य आणि मेघा यांनी एकत्र येत लग्न केलं.
advertisement
4/8
अभिनेत्री रेणुका शहाणे गेली अनेक वर्ष प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणाबरोबर सुखाचा संसार करतेय. त्याआधी तिचं लग्न प्रसिद्ध मराठी निर्माते आणि लेखक विजय केंकरे यांच्याबरोबर झालं होतं.
advertisement
5/8
अभिनेता पियुष रानडे याने दोन लग्न मोडल्यानंतर अभिनेत्री सुरुची अडारकरबरोबर तिसरं लग्न केलं.
advertisement
6/8
अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी लग्न केलं होतं. पण त्यांचा संसार काही महिन्यातच मोडला. तेजश्रीबरोबर घटस्फोटानंतर शशांक केतकरने दुसरं लग्न केलं. शशांकला एक मुलगाही आहे.
advertisement
7/8
अभिनेते महेश मांजरेकर यांचंही मेधा यांच्याबरोबर दुसरं लग्न आहे. महेश मांजरेकरांचं पहिलं लग्न दीपा मेहताबरोबर झालं होतं. सत्या आणि अश्विमी ही त्यांनी दोन मुलं आहेत. दीपा यांच्याबरोबर घटस्फोटानंतर महेश यांनी मेधा यांच्याशी लग्न केलं. दोघांना सई मांजरेकर ही मुलगी आहे.
advertisement
8/8
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं पहिलं लग्न चंद्रकांत कुलकर्णीबरोबर झालं होतं. दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर सोनालीने सोनी एंटरटेनमेंटचा CEO नचिकेत पटवैद्यबरोबर लग्न केलं. सोनाली आणि नचिकेत यांना एक मुलगी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Actors Second Marriage : असे 8 मराठी कलाकार ज्यांनी डिवोर्सनंतर पुन्हा थाटला संसार, एकाचं तर तिसरं लग्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल