TRENDING:

Malaika Arora: अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर सावरली मलायका अरोरा, दुसऱ्यांदा थाटणार संसार? प्रेमात पडण्याबाबत म्हणाली...

Last Updated:
Malaika Arora Love Life: मलायका सध्या सिंगल आहे की पुन्हा प्रेमात पडली आहे, याकडे तिच्या चाहत्यांचं नेहमीच लक्ष असतं. लग्नाबद्दलच्या प्रश्नावर तिने अत्यंत सूचक उत्तर दिलं.
advertisement
1/8
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर सावरली मलायका अरोरा, दुसऱ्यांदा थाटणार संसार?
मुंबई: मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचं नातं तुटून आता बराच काळ लोटला आहे. अरबाजने दुसरं लग्न करून नवा संसारही थाटला, पण मलायका मात्र तिच्या घटस्फोटावर नेहमीच शांत राहिली.
advertisement
2/8
मात्र, आता पहिल्यांदाच मलायकाने आपल्या आयुष्यातील त्या वादळी काळावर मनातील खदखद व्यक्त केली आहे. "घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हा परके तर सोडाच, पण जवळच्या नातेवाईकांनीही मला टोमणे मारण्याची संधी सोडली नव्हती," अशा शब्दांत मलायकाने आपला संताप व्यक्त केला आहे.
advertisement
3/8
एका खास मुलाखतीत मलायकाने समाजाच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवलं. ती म्हणाली, "आपला समाज अजूनही पुरुषप्रधान मानसिकतेत अडकलेला आहे. जर एखाद्या पुरुषाचा घटस्फोट झाला, तर त्याच्यावर कोणीच बोट उचलत नाही. पण तेच जर एखाद्या महिलेने घटस्फोटाचा धाडसी निर्णय घेतला, तर तो घटस्फोट होण्यामागे महिलेचीच चूक असते, असं आजही या समाजात मानलं जातं."
advertisement
4/8
आयुष्यात घेतलेल्या निर्णयांबद्दल मलायका म्हणाली, "माझ्या चारित्र्यावर, माझ्या निर्णयावर हजारो प्रश्न उपस्थित केले गेले. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते आणि आजही मला त्याचा कोणताही पश्चात्ताप नाही."
advertisement
5/8
काही दिवसांपूर्वी अरबाज खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो एका गाण्यावर डान्स करताना दिसत होता, "तेरे लिए मैंने पहले वाली छोड दी". दरम्यान, या गोष्टीवर मलायकाने पहिल्यांदाच दिलेली ही प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे.
advertisement
6/8
मलायका सध्या सिंगल आहे की पुन्हा प्रेमात पडली आहे, याकडे तिच्या चाहत्यांचं नेहमीच लक्ष असतं. लग्नाबद्दलच्या प्रश्नावर तिने अत्यंत सूचक उत्तर दिलं.
advertisement
7/8
ती म्हणाली, "माझा लग्नावरचा विश्वास उडालेला नाही. मी संसारात राहिले आहे, माझं एक कुटुंब होतं. आजही मी प्रेमावर तितकंच प्रेम करते. मला प्रेम करायला आणि कोणाचं तरी प्रेम मिळवायला नक्कीच आवडेल. मी लग्नासाठी किंवा प्रेमासाठी धावपळ करत नाहीये, पण जर उद्या माझ्या आयुष्यात पुन्हा प्रेमाने दार ठोठावलं, तर मी त्याचं स्वागत खुल्या मनाने करेन."
advertisement
8/8
घटस्फोटानंतर झालेल्या ट्रोलिंगबद्दल बोलताना मलायका सांगते की, लोक फक्त जज करायला बसलेले असतात. "घटस्फोट झाला म्हणजे ती स्त्री तुटली किंवा ती चुकीची आहे असं नाही. मी त्या काळात स्वतःला सावरलं आणि पुन्हा जिद्दीने उभी राहिले. आज मी माझ्या अटींवर जगतेय आणि हेच माझं यश आहे."<span style="font-size: 20px;"> </span><span style="font-size: 20px;"> </span><span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Malaika Arora: अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर सावरली मलायका अरोरा, दुसऱ्यांदा थाटणार संसार? प्रेमात पडण्याबाबत म्हणाली...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल