Navya Nair: कोण आहे नव्या नायर? गजऱ्यामुळे आली अडचणीत, थेट 1.25 लाखांचा बसला फटका
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
एक धक्कादायक घटना समोर आलीय. गजऱ्यामुळे लोकप्रिय अभिनेत्रीला अडचणीत आणलं आणि तिला तब्बल 1.25 लाखांचा दंड मोजावा लागला.
advertisement
1/7

भारतीय संस्कृतीत केसांमध्ये गजरा माळणं हे सौंदर्याचं आणि परंपरेचं प्रतीक मानलं जातं. विशेषत: ओणमसारख्या सणांमध्ये, गजऱ्याशिवाय साजशृंगार अपूर्ण वाटतो. पण याच गजऱ्यामुळे लोकप्रिय अभिनेत्रीला अडचणीत आणलं आणि तिला तब्बल 1.25 लाखांचा दंड मोजावा लागला.
advertisement
2/7

घटना घडली ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये. मल्याळम अभिनेत्री नव्या नायर ओणम उत्सवात सहभागी होण्यासाठी गेली होती. कोची विमानतळावरून तिच्या वडिलांनी खास तिच्यासाठी चमेलीचा गजरा आणला होता.प्रवासादरम्यान तिने तो गजरा अर्धा करून एक भाग केसांत माळला. मात्र फुलं कोमेजल्याने उरलेला भाग तिने बॅगेत ठेवला. तिथूनच तिची अडचण सुरू झाली.
advertisement
3/7
मेलबर्न विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान तिच्या पर्समध्ये चमेलीची फुलं आढळली. ऑस्ट्रेलियाच्या कठोर जैव-सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही प्रकारचं फुल, बिया, माती किंवा वनस्पती देशात नेणं गुन्हा मानला जातो. कारण यामुळे स्थानिक शेतीला आणि परिसंस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच अधिकाऱ्यांनी तिला थेट 1980 ऑस्ट्रेलियन डॉलर्स दंड (भारतातील सुमारे 1.25 लाख रुपये) ठोठावला.
advertisement
4/7
ओणम कार्यक्रमात सहभागी होताना नव्याने स्वतः व्यासपीठावरून हा किस्सा सांगितला. ती म्हणाली, “ही माझी मोठी चूक होती, पण ती जाणूनबुजून नव्हती. फक्त वडिलांच्या सांगण्यावरून मी गजरा सोबत घेतला होता. आता मला 28 दिवसांत दंड भरायला सांगण्यात आलं आहे.”
advertisement
5/7
या प्रसंगाने नव्या नायर चाहत्यांना आणि उपस्थित लोकांना धक्का बसला. अनेकांनी सोशल मीडियावर तिची सहानुभूती व्यक्त केली. पण त्याचबरोबर हा अनुभव इतरांसाठी एक मोठा धडा ठरला आहे. परदेशात प्रवास करताना स्थानिक कायद्यांची माहिती असणं किती आवश्यक आहे, याची आठवण ही घटना करून देते.
advertisement
6/7
दरम्यान, नव्या नायर कोण आहे. अभिनेत्री नव्या नायर ही एक प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री आहे, जी प्रामुख्याने मल्याळम आणि कन्नड सिनेमांमध्ये काम करते.नव्याने 2000 साली 'इष्टम' (Ishtam) या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले.
advertisement
7/7
नव्याला आपल्या अभिनयासाठी नव्याने अनेक पुरस्कार जिंकले आहेत, ज्यात दोन वेळा केरळ राज्य चित्रपट पुरस्कार आणि दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Navya Nair: कोण आहे नव्या नायर? गजऱ्यामुळे आली अडचणीत, थेट 1.25 लाखांचा बसला फटका