Kids Good Behavior : मुलांच्या स्वभावात चांगला-सकारात्मक बदल घडवायचाय? 'या' 4 गोष्टींचा होईल फायदा..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Positive Reinforcement Techniques For Good Behavior : मुलांनी चांगले संस्कार आणि चांगल्या सवयी शिकाव्यात अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. भविष्यात एक चांगले आणि यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी हे गुण आवश्यक असतात. परंतु यासाठी पालकांनी देखील काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला काही टेक्निक्स सांगणार आहोत, ज्याचा मुलांच्या वागण्यात बदल करण्यात फायदा होईल.
advertisement
1/7

मुलांचे वर्तन त्यांच्या पालकांकडून आणि आजूबाजूच्या वातावरणातून तयार होते. मूल लहान असते तेव्हा ते आपल्या आई-वडिलांना पाहून त्यांच्यासारखे बोलणे, बसणे-उठणे शिकते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलाला योग्य वर्तन शिकवायचे असेल, तर सर्वात आधी तुम्हाला स्वतःच्या सवयींकडे लक्ष देणे आणि त्या सुधारणे आवश्यक आहे.
advertisement
2/7

आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत, मुलेही काही प्रमाणात तणावात असतात आणि याचा त्यांच्या वर्तनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही मुलांमध्ये सकारात्मक वर्तन वाढवू शकता. चला पाहूया मुलांमध्ये सकारात्मक वर्तन वाढवण्यासाठी सोप्या टिप्स.
advertisement
3/7
मुलांसाठी स्वतः 'रोल मॉडेल' बना : लहान मुले त्यांच्या आजूबाजूला जे वर्तन पाहतात, तेच योग्य मानतात आणि तसेच वागू लागतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलाला चांगले वर्तन शिकवायचे असेल, तर तुम्ही स्वतः सकारात्मक राहा आणि घरातही सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.
advertisement
4/7
मुलांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका : तुम्हाला तुमच्या मुलाच्या वर्तनात सकारात्मकता पाहायची असेल, तर त्याच्या बोलण्याकडे आणि विचार करण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या. त्यांना प्रोत्साहन द्या. मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्यांचे वर्तन आणि विचार नकारात्मक बनू शकतात.
advertisement
5/7
प्रत्येक लहान यशासाठी प्रोत्साहन द्या : मुलांवर विश्वास ठेवा आणि त्यांना छोट्या-छोट्या गोष्टींची जबाबदारी द्या. चांगले काम केल्यावर त्यांचे कौतुक करा. असे केल्याने त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल आणि प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक होईल.
advertisement
6/7
प्रत्येक गोष्टीत रोखणे-टोळणे टाळा : लहानसहान गोष्टींवर मुलांना सतत रोखणे-टोकणे योग्य नाही. असे केल्यास मुले हट्टी बनतात आणि तुमच्या बोलण्याचा किंवा रागावण्याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी असे वागणे टाळा.
advertisement
7/7
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kids Good Behavior : मुलांच्या स्वभावात चांगला-सकारात्मक बदल घडवायचाय? 'या' 4 गोष्टींचा होईल फायदा..