ज्या मुंबईने भिखू म्हात्रेला केलं किंग, आता तिच नको झाली; मनोज वाजपेयीचा मोठा निर्णय
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Manoj Bajpayee : सत्या हा सिनेमा अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या करिअरमध्ये महत्त्वाचा सिनेमा ठरला. भिखू म्हात्रे मुंबईचा किंग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पण ज्या मुंबईने मनोज वाजपेयीला किंग बनवलं तिची मुंबई आता त्यांना नकोशी झाली आहे.
advertisement
1/7

अभिनेते मनोज वाजपेयी त्यांच्या 'इन्स्पेक्टर झेंडे' या सिनेमामुळे चर्चेत आहे. येत्या 5 सप्टेंबरला हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे.
advertisement
2/7
या सिनेमाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत बोलताना मनोज वाजपेयी यांनी मुंबईत मला कधीच आपलेपणा वाटला नाही असं म्हटलं. मुंबई शहराबद्दल असलेले त्यांचे विचार त्यांनी शेअर केले.
advertisement
3/7
मनोज वाजपेयी म्हणाले, "मुंबईच्या ट्रॅफिकमुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही याची खंत आहे. शूटिंग असायचो तेव्हा माझा नेहमी हा प्रयत्न असायचा की लवकर घरी पोहोचावं. पण मुंबईचं ट्रॅफिक ही मोठी कटकट आहे."
advertisement
4/7
"मी संध्याकाळी घरी पोहोचलो की माझ्या घरातले झोपलेले असतात. माझी मुलगी माझी वाट पाहून झोपून जायची, मी जायचो तेव्हा ती उठायची आणि मग तिला पुन्हा झोपवणं कठीण व्हायचं."
advertisement
5/7
"मुंबईत शूटिंग असलं की घरी न जाता हॉटेलमध्ये थांबायचो. माझं रूटीन बनून राहतं पण मुलीला वेळ देता येत नाही याचं वाईट वाटतं."
advertisement
6/7
मनोज वाजपेयी पुढे म्हणाले, "मुंबईसारखं मोठं शहर हे माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. मुंबईत मला कधीच आपलेपणा वाटला नाही. मी आजवर कधीच या मोठ्या शहाराचा होऊ शकलो नाही."
advertisement
7/7
"हे सगळं सोडून जावं असा विचार मनात अनेकदा आलाय. एक वेळ अशी येईल जेव्हा खरंच मी हे शहर सोडेन."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ज्या मुंबईने भिखू म्हात्रेला केलं किंग, आता तिच नको झाली; मनोज वाजपेयीचा मोठा निर्णय