TRENDING:

Astrology: पूर्वजांची पुण्याई..! पितृपक्षात भद्र महापुरुष राजयोग जुळल्यानं 3 राशीच्या लोकांना जॅकपॉट; पितृकृपा

Last Updated:
PitruPaksha Horoscope 2025: वैदिक कॅलेंडरनुसार, या वर्षी पितृपक्ष 7 सप्टेंबरपासून सुरू झाला असून 21 सप्टेंबर रोजी संपेल. येत्या 14 सप्टेंबर रोजी व्यवसायाचा कारक बुध त्याच्या उच्च राशी म्हणजे कन्या राशीत प्रवेश करेल. त्यामुळे भद्र महापुरुष राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे काही राशींचे भाग्य चमकू शकते. यासोबतच उत्पन्नात वाढ होण्यासोबतच करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मन प्रसन्न राहील. जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
advertisement
1/5
पूर्वजांची पुण्याई..! पितृपक्षात भद्र महापुरुष राजयोग जुळल्यानं 3 राशींना फायदा
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी भद्र महापुरुष राजयोगाची निर्मिती लाभदायक ठरू शकते. कारण बुध तुमच्या गोचर कुंडलीतून नवव्या घरात भ्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. तसेच व्यवसायात उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील.
advertisement
2/5
मकरेच्या नोकरदारांचा पगार वाढून नोकरीत बढती मिळू शकते. त्याचबरोबर तुम्ही देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करू शकता. व्यापारी वर्ग आर्थिकदृष्ट्या समृद्ध होईल. नोकरी करणाऱ्यांना समाजात उच्च स्थान मिळविण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील. विद्यार्थ्यांचे परदेश प्रवासाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
advertisement
3/5
धनू - भद्र महापुरुष राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या कर्मभावावर तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकते. तसेच, नोकरी करणारे लोक एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाचा सहभागी होऊ शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांची कार्यशैली सुधारण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांना स्मार्ट निर्णयांचा फायदा होईल. तुम्हाला तुमच्या इच्छित ठिकाणी बदली केली जाऊ शकते. तसेच, कामात तुम्हाला तुमच्या वडिलांचा पाठिंबा मिळेल.
advertisement
4/5
सिंह - भद्र महापुरुष राजयोगाच्या निर्मितीमुळे सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण बुध तुमच्या राशीपासून दुसऱ्या स्थानावर प्रवास करणार आहे. त्यामुळे, या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल, कोणत्याही कामात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. तसेच तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
advertisement
5/5
सिंह राशीचे लोक समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतील. तसेच या काळात व्यापारी वर्ग आर्थिकदृष्ट्या समृद्ध होईल. तसेत ज्यांचे काम/व्यवसाय मार्केटिंग, भाषण, बँकिंग आणि मीडियाशी संबंधित आहे, त्यांना चांगले फायदे मिळू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: पूर्वजांची पुण्याई..! पितृपक्षात भद्र महापुरुष राजयोग जुळल्यानं 3 राशीच्या लोकांना जॅकपॉट; पितृकृपा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल