TRENDING:

'मराठी आर्टिस्ट्सना मागे बसवतात आणि...', अमराठी कलाकारांच्या मुद्द्यावर सई ताम्हणकरने डागली तोफ, मांडले रोखठोक सवाल

Last Updated:
Sai Tamhankar: अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी निमित्त कोणतं गाणं किंवा चित्रपट नाही, तर मराठी सिनेसृष्टीतील एका जळजळीत वास्तवावर तिने बोट ठेवलं आहे.
advertisement
1/6
'मराठी कलाकारांना मागे बसवतात...', सई ताम्हणकरने डागली तोफ, मांडले रोखठोक सवाल
मुंबई : आपल्या रोखठोक विधानांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी निमित्त कोणतं गाणं किंवा चित्रपट नाही, तर मराठी सिनेसृष्टीतील एका जळजळीत वास्तवावर तिने बोट ठेवलं आहे.
advertisement
2/6
मराठी पुरस्कार सोहळ्यांमध्ये आपल्याच दिग्गज कलाकारांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल सईने संताप व्यक्त केला असून, "ग्लॅमरच्या नादात आपण आपली माती विसरतोय का?" असा सवाल तिने उपस्थित केला आहे. 'विषय खोल' या प्लॅटफॉर्मशी बोलताना सईने पुरस्कार सोहळ्यांच्या पडद्यामागचं विदारक चित्र मांडलं.
advertisement
3/6
ती म्हणाली, "पुरस्कार सोहळ्यांमध्ये टीआरपी वाढवण्यासाठी आणि सोहळ्याला ग्लॅमर प्राप्त करून देण्यासाठी आपण दुसऱ्या इंडस्ट्रीमधील अमराठी कलाकारांना आमंत्रित करतो. त्यांना सन्मानाने पहिल्या रांगेत बसवलं जातं. पण त्याच वेळी ज्यांनी ३०-४० वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी रक्त आटवलं, त्या ज्येष्ठ कलाकारांना मात्र अनेकदा मागच्या रांगेत स्थान दिलं जातं. हे पाहून मला प्रचंड त्रास होतो."
advertisement
4/6
सईने पुढे तिखट शब्दांत टीका करत म्हटलं की, "आज ज्यांना आपण मागच्या रांगेत बसवतोय, तेच ज्येष्ठ कलाकार एकेकाळी इतके लोकप्रिय होते की त्यांच्या चित्रपटांची तिकिटं २००-३०० रुपयांना ब्लॅक मार्केटमध्ये विकली जायची. बाहेरून आलेलं कोणीतरी मोडकतोडक मराठी बोललं की आपण त्याचं सेलिब्रेशन करतो. पण आपण स्वतःच्या कलाकारांना किती सेलिब्रेट करतोय? अमराठी लोकांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच माणसांचा अपमान करतोय, हे आपण कधी समजून घेणार?"
advertisement
5/6
सई ताम्हणकरच्या या विधानामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे. तिने स्पष्टपणे मांडलं की, दुसऱ्यांच्या चकाकीपेक्षा आपल्या मेहनती कलाकारांची प्रतिष्ठा जास्त महत्त्त्वाची आहे.
advertisement
6/6
माध्यमांनी आणि चाहत्यांनीही या विषयावर जागरूक राहण्याची गरज असल्याचं आवाहन तिने केलं आहे. सईच्या या भूमिकेला सिनेसृष्टीतील अनेक तंत्रज्ञ आणि कलाकारांनी पाठिंबा दर्शवला असून, पुरस्कार सोहळ्यांच्या आयोजकांना आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मराठी आर्टिस्ट्सना मागे बसवतात आणि...', अमराठी कलाकारांच्या मुद्द्यावर सई ताम्हणकरने डागली तोफ, मांडले रोखठोक सवाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल