TRENDING:

खुसका, मेल्या... मराठी मालिकेचा खलनायक, दिसला की प्रेक्षकांच्या जातो डोक्यात, देतात शिव्या

Last Updated:
मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय खलनायक साकारणाऱ्या अभिनेत्यानं नुकताच त्याचा अनुभव शेअर केला. अभिनेता नेमकं काय म्हणाला.
advertisement
1/9
खुसका, मेल्या... मराठी मालिकेचा खलनायक, दिसला की प्रेक्षकांच्या जातो डोक्यात, देतात शिव्या
प्रत्येक कलाकाराला त्याच्या कामाची पावती हवी असते. कोणताही कलाकार त्याची भूमिका साकारण्यासाठी त्याचे शंभर टक्के देत असतो तेव्हाच ती भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करते. आपल्या कामाचं कौतुक व्हावं हे सगळ्यांनाच वाटतं मग ती नायक, नायिका असो किंवा खलनायक, खलनायिका.
advertisement
2/9
मराठी टेलिव्हिजनवर आजवर अनेक मालिकांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यानं नुकताच त्याचा अनुभव शेअर केला. त्याच्या भूमिकेचं प्रेक्षकांची कौतुक केलं. पण इतकं कौतुक केलं की तो दिसला की लोक त्याला शिव्या देऊ लागले.
advertisement
3/9
अभिनेत्यासाठी लोकांच्या शिव्या म्हणजे त्याच्या कामाची पोचपावती आहे. पण त्याच्यामागे त्याने एक खंत देखील व्यक्त केली.
advertisement
4/9
आपण बोलत आहोत ते म्हणजे टेलिव्हिजनवर अनाजी पंत ही भूमिका साकारणारे अभिनेते महेश कोकाटे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत त्यांनी साकारलेले अनाजी पंत खूप लोकप्रिय झाले.
advertisement
5/9
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना महेश कोकाटे यांनी त्यांच्या खलनायिकी भूमिकांबद्दल सांगितलं. ते म्हणाले, लोक मला शिव्या देतात हिच माझ्या कामाची पोचपावती आहे.
advertisement
6/9
मला पाहिल्यानंतर लोक मला कुसका, मेल्या वगैरे म्हणतात हाच माझ्यासाठी पुरस्कार आहे. अनाजी पंत या भूमिकेमुळे आता मला सवय आहे. अनाजी पंत हे माझ्या आयुष्यातील पहिलं नकारात्मक पात्र होतं.
advertisement
7/9
स्वराज्यरक्षक संभाजीनंतर महेश कोकाटे यांनी अगं बाई सासूबाई मालिकेत निगेटीव्ह रोल केला. त्यानंतक स्वराज्य जननी जिजामाता मालिकेत त्यांनी खंडोजी खोपडे आणि स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेत त्यांनी नागोजी माने हे पात्र साकारलं होतं.
advertisement
8/9
निगेटिव्ह भूमिकांबद्दल बोलताना ते म्हणाले, ही सगळं नकारात्मक पात्र साकारताना मला असं जाणवलं की मी खूपच नकारात्मक पात्र साकारली आहेत. त्यानंतर अबोली मालिकेत माधव शिंदेसाठी माझी निवड झाली जे सकारात्मक होतं.
advertisement
9/9
अभिनेते महेश कोकाटे हे सध्या मी सावित्रीबाई जोतीराव फुले या मालिकेतही काम करत आहेत. त्यात ते गंगाधर शास्त्री हे पात्र साकारत आहेत. हे पात्र नकारात्मक पात्र आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
खुसका, मेल्या... मराठी मालिकेचा खलनायक, दिसला की प्रेक्षकांच्या जातो डोक्यात, देतात शिव्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल